Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न




१. ०९ आदर्श ग्रामसेवक तर १३० ग्रामसेवक व ग्रा.पं कर्मचाऱ्यांचा झाला गौरव

२.जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा उपक्रम 

परभणी  ➡️ जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करून सर्वसामान्य ग्रामस्थांचे राहणीमान उंचावण्यासाठी व अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी विशेष सहाय्य करून उत्कृष्ट काम केल्या बद्दल आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व शासनाच्या विविध विकास कामात व अभियानात उत्कृष्ट कार्य केलेले ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. (vnsnews-24, feature, parbhani ) 




बुधवार दि. २९ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन परभणीतील राजलक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते.  यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक जिल्हाधिकारी आंचल गोयल, कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रमुख अतिथी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गीते, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम, ग्रामसेवक युनियनचे राज्य कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हाध्यक्ष रामराव राठोड, जिल्हा सरचिटणीस ज्ञानोबा दुधाटे, सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



  👇  हे आहेत आदर्श ग्रामसेवक   👇  

१.रमेश घिरडकर - ग्रा.पं धनगर टाकळी ता पूर्णा, २.हरिश्चंद्र चिंचाणे ग्रा.पं  झरी ता. पाथरी, ३.संजय शिंदे ग्रा.पं सावरगाव खुर्द ता मानवत, ४.राम नलवाड, ग्रा.पं  नरळद ता गंगाखेड, ५.नंदू बेलके ग्रा.पं  सातेगाव ता.पालम, ६.भागवत मुंडे ग्रा.पं  वडगाव स्टेशन ता.सोनपेठ, ७.निलेश भांबट ग्रा.पं  अकोली ता जिंतूर, ८.अजय जैस्वाल ग्रा.पं  हातनूर ता.सेलू, ९.सतीश बनसोडे ग्रा.पं झरी ता परभणी.






यासोबत घनवन वृक्ष लागवड, कर वसुली, लेख आक्षेप निराकरण, दप्तर अद्यावतीकरण, बालविवाह निर्मूलन विषयक कामगिरी, शाळा, अंगणवाडी, वैयक्तिक नळ जोडणी, घरकुल योजना मंजुरी व पूर्णत्व , सुंदर माझे गाव, आयुष्मान भारत सेवा योजना(के वाय सी), आपले सरकार सेवा केंद्र, मनरेगा आदी शासकीय योजनेमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.






यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या कि, प्रत्येकाला आपल्या कामाचा अभिमान वाटला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी शासनाची योजना पारदर्शीपणे खेड्यातील लोकांपर्यंत पोहोचावी, ग्रामसेवकांनी अद्यावत माहिती ठेवावी, चुकीचे दाखले दिले जाऊ नयेत, बाल विवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, नोडल अधिकारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, दिव्यांगांना ओळखपत्र मिळण्यासाठी त्यांची माहिती ऑनलाईन करावी तसेच प्रत्येकाला अभिमान वाटेल असे काम करण्याचे आवाहन आंचल गोयल यांनी केले.      




तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष रश्मी खांडेकर म्हणाल्या कि, ग्रामविकासात ग्रामसेवकांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी अडचणींचा सामना करून वाईट परिस्थितीवर मात करावी. प्रामाणिक कामातून आत्मिक समाधान मिळते. चांगल्या सोई-सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना कर वसुलीची सवय लावण्याचे आवाहन यावेळी रश्मी खांडेकर यांनी केले. 




कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 





कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनी आभार गंगाखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी पंचायत राजाराम सूर्यवंशी, विस्तार अधिकारी पंचायत  संतोबा चिलगर, कक्ष अधिकारी नाईक, वरिष्ठ सहाय्यक श्रीमती यादव, तसेच परभणी जिल्हा ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.







Post a Comment

0 Comments