Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/भाजपाचे आंदोलन लेखी आश्‍वासनानंतर मागे





कारखान्याद्वारे ऊसाच्या एफआरपीची रक्कम अदा होणार : सहकार मंत्र्यांद्वारे दखल

परभणी ➡️ श्री लक्ष्मी नृसिंह शुगरच्या व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांसह ऊस उत्पादकांनी उसाच्या ‘एफआरपी’च्या थकीत रक्कमेसाठीचे आंदोलन बुधवारी (दि.29) मागे घेतले. (vnsnews-24, feature, parbhani ) 




भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीणचे अध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर अध्यक्ष आनंदराव भरोसे, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर आदींनी बुधवारी कारखाना स्थळ गाठून किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ऊस उत्पादकांसह कार्यकर्त्यांच्या आंदोलनास समर्थन जाहीर केले. 




तेथूनच सहकार मंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला. काही दिवसांपासून कारखाना प्रशासनाने चालढकल सुरु केल्याचा आरोप केला. त्यावेळी सावे यांनी कारखाना व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. अखेर गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या केन पेमेंट बाबत प्रतिटन सर्वच शेतकर्‍यांना  2300 रुपये देण्याचे व संपूर्ण एफआरपी 10 मे महिन्याच्या आत देण्याचे आश्‍वासन व्यवस्थापनाने दिले.







जानेवारी - 2023 व फेब्रुवारी 2023 मधील गाळप केलेल्या उसाचे पेमेंट प्रति मे.टन रक्कम 2300  प्रमाणे 30 एप्रिल 2023 पर्यंत अदा करण्यात येईल. नोव्हेंबर 2022 व डिसेंबर-2022 मध्ये गाळप केलेल्या उसावरील प्रति मे.टन केनपेमेंट उर्वरित रक्कम 100 रूपये प्रति मे.टनप्रमाणे पेमेंट व मार्च 2023 मध्ये गाळप झालेल्या संपूर्ण उसाचे केन पेमेंट प्रति में.टन 2300 रूपये प्रमाणे  30 एप्रिल 2023 पर्यंत अदा करण्यात येईल. तसेच गाळप हंगाम 2022-23 ची संपुर्ण थकीत एफआरपी रक्कम 10 मे 2023 पर्यंत पुर्ण देण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानेच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 



दरम्यान, या आंदोलनात माधवराव लांडगे अरुण गवळी, माणिक बल्लाळ, विष्णु सिरसाट, मुंजाभाऊ कदम, मदनराव वाघ, मधुकर वाघ, उध्दव ढगे, सटवाजी गोरे, संतिष घाडगे, उध्दव बिडगर, अंगद वैरागर, बाबासाहेब वाघ, सुरेश कच्छवे, पांडुरंग पवार, रामा बाबर यांच्या सह शिंगणापूर, आमडापूर, सहजपुर, जवळा, शीर्शी, पोखर्णी, इंदेवाडी भारसवाडा, सुरपिपंरी, पिंपळगाव, उमरी, तांबसवाडी बोरवंड, ताडपागरी आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments