Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ अखेर बेपत्ता "त्या" शेतकऱ्याच्या मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला





जिंतूर ➡️ तालुक्यातील यलदरी धरणाच्या अंबरवाडी शिवारातील बॅक वॉटर मधून शेतात जात असताना थर्माकोलच्या तरफ्यातून जात असताना शेतकरी बेपत्ता झाल्याची घटना 25 मार्च रोजी घडली होती. परंतु आपत्ती व्यवस्थापन व आपदा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. मात्र दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सदरील शेतकऱ्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. (vnsnews-24, feature, crime ) 




याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अंबरवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव यदाजी जाधव वय 60 वर्ष हे शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात थर्माकोलच्या तरफयातून जात असताना तोल जाऊन पाण्यात पडले असल्याचे गावकऱ्यांनी अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान काठावर तराफा व टोपी आढळून आल्यामुळे पाण्यात बुडुन बेपत्ता झाले होते. याबाबत पोलीस व महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन व आपदा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी काल दिवसभर शोधकार्य केले.





मात्र त्यांचा हाती काहीच लागले नसल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी सदरील शेतकऱ्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. यावेळी घटनास्थळी पोऊनी ननावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घुगे, माजी सरपंच राजेभाऊ घुगे, पोलीस पाटील रामेश्वर कापुरे यांची उपस्थिती होती यावेळी पोलिसांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे.






Post a Comment

0 Comments