Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/खेळाडू खेळातून आपले करीअर घडू शकतात: नरेंद्र पवार




परभणी ➡️  जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक  26 व 27 मार्च  2023 या कालावधीत जिल्हा अजिंक्यपद  टेबल टेनिस  स्पर्धा व महिला टेबल टेनिस स्पर्धा आयोजन मानवत स्पोर्ट्स  अकादमी मानवत यांच्यावतीने करण्यात आले आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 






या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार म्हणाले कि,  खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत प्रविण्य प्राप्त केल्यावर आज राज्य व भारत सरकारच्या वतीने अनेक शिष्यवृत्ती, नोकरीत आरक्षण प्राप्त होते. व यातून खेळाडू आपले करीअर घडू शकतात असे प्रतिपादन केले. विविध खेळाचा प्रसार व विकास  करण्याच्या हेतुने मानवत स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन  सातत्याने करण्यात  येत आहे. 




या संस्थेच्यावतीने नुकत्याच राज्यस्तरीय महिला कबड्डी व मिनी हाॅलीबाॅल राज्य  अजिंक्यपद  स्पर्धेचे यशस्वी आयोजन  करण्यात  आले आहे. टेबल टेनिस  स्पर्धेचे आयोजन परभणी येथील 'सिटी क्लब' च्या टेबल  टेनिस  हॉलमध्ये  करण्यात आले आहे. स्पर्धा सकाळी  11 वा. शानदार उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, जिल्हा सचिव गणेश माळवे, प्रा.नागेश कान्हेकर, मानवत स्पोर्ट्स ॲकडमी अध्यक्ष किशन भिसे,  सचिव ज्ञानेश्वर ठोंबरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

 



सदरील स्पर्धेत 1) 11 वर्षे ,14 वर्षे 17 वर्ष ( मुले / मुली ) खुलागट ( पुरुष/ महिला )व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 30 वरील महिला गटात टेबल टेनिस स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेबल टेनिस प्रशिक्षक चेतन मुक्तावार, तर आभार प्रदर्शन प्रा नागेश कान्हेकर यांनी केले. जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत रोख बक्षिसे पदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.



अंतिम निकाल 👇

  1. 11 मुले : प्रथम:-शिवम अनिल डख, व्दितीय:- आरुष गुलाब ताठे 
  2. 14 मुले : प्रथम: युवराज तुकाराम सवणे, व्दितीय: रुद्र गोविंद टाक.
  3. U-17 मुले : प्रथम:-स्मित रोशन करेवार, व्दितीय: शिवनंदन मनोहर पुरी.
  4. पुरुष गटात : प्रथम: रोहीत भगवतीलाल जोशी, व्दितीय:-अजिंक्य रविकांत घन.
  5. 11 वर्षे आतील मुली: प्रथम:-काव्या निखिल केंद्रेकर,   व्दितीय :- पलक गुंडेराव बोरोळे
  6. 14 वर्षे मुली : प्रथम:आद्या महेश बाहेती, व्दितीय: समृद्धी नांदापूरकर.
  7. U-17 मुली: प्रथम:-शरयु माधव टेकाळे, व्दितीय:-भूमिका गुंडेराव बोरोळे
  8. खुला महिला: प्रथम:-ओवी महेश बाहेती, व्दितीय: भक्ती अण्णासाहेब मुक्तावार.


जागतिक महिला दिनानिमित्त विशेष महिला स्पर्धा:

30 वर्षांवरील वरीष्ठ महिला गटात ,प्रथम: प्रा.गोदावरी राजेश कदम (पवार), व्दितीय:डॉ.पूजा महेश बाहेती, तृतीय : सारीका माधव टेकाळे आणि तृतीय : ज्योती दीक्षित





स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच प्रमुख अजिंक्य घन, निखिल झुटे, गजानन समिंद्रे,विजय अवचार, सूरज भुजबळ,तुषार जाधव, उमेश देशमुख, श्रेया फुलसुरे, गुणवंत कदम, गौस खान पठाण, चेतन सुरवसे,मिथुन राठोड, लखन चव्हाण,शंकर शेळके,  योगेश चव्हाण, रामेश्वर आदी ने परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments