Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ देशात लोकशाहीची मुस्कटदाबी - काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे





जिंतूर ➡️ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वामध्ये खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध म्हणून माननीय राष्ट्रपती भारत सरकार व माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन यांना तहसीलदार जिंतूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. (vnsnews-24, feature, jintur ) 





सदर निवेदनामध्ये भारतीय जनता पार्टी ही सूडबुद्धीचे राजकारण करत असून गुजरात येथील सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलेले असताना त्यांना वरील न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला असतो. परंतु राजकीय द्वेष भावना व सूडबुद्धी करत भाजप सरकारने क्षणाचाही विलंब न करता खासदार राहुलजी गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. 






तसेच भारतीय संविधानाने घटनेच्या कलम 19 अन्वये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला असताना राहुलजी गांधी हे लोकसभेमध्ये जनतेच्या हितासाठी अदानी विरोधात जेपीसी नेमण्याची मागणी करताच त्यांच्या मागणीला विरोध करत संसदेचा वेळ वाया घालवत व राजकीय आकसापोटी राहुलजी गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करत भाजप सरकारने एक प्रकारे संसदीय परंपरा, लोकशाही व भारतीय संविधान याची हत्याच हत्याच केलेली आहे. 






भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षातील सक्षम नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी धरून सूडबुद्धीने व राजकीय आकसापोटी कारवाई करण्याच्या नेहमी तयारीत असते असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही सदर निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. 






याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैया नागरे जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी परभणी नानासाहेब राऊत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल केशवराव बुधवंत,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवक काँग्रेस नागसेन भेरजे,राजेंद्र नागरे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी प्रदीप राव देशमुख,शहराध्यक्ष काँग्रेस बासू पठाण, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष लक्ष्मी राठोड, गजानन रोकडे,  सुलेमान सिद्दिकी मोसिन पठाण, तहसीन देशमुख, गब्बर घनसावंत, तालुका संघटक इर्शाद पाशा चांद पाशा, नानासाहेब निकाळजे, दीपक चव्हाण, (सरपंच सोनापूर), महेश सांगळे राहुल कुटे, रहमान भाई मुखीद, रामप्रसाद माघाडे, संतोष आंधळे, डॉ. निशांत मुंडे, अज्जू कुरेशी, मुसा कुरेशी, गब्बर घनसावंत, लखन कुरे, योगेश कंठाळे, नितीन वाणी, योगेश बुधवंत,(सरपंच जाम), दिलीप वाकळे, जम्मू पठाण, सिराज भाई पठाण, रिजवान आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments