Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ अंबरवाडी येथील शेतकरी तलावात बेपत्ता; पोलीस प्रशासनाची शोध मोहीम सुरू




जिंतूर ➡️  येलदरी धरणाच्या बॅक वॉटर मधील अंबरवाडी येथील शेतकरी शेतात कामासाठी तरफयातून जात असताना पाण्यात पडून बेपत्ता झाल्याची घटना 25 मार्च रोजी घडली.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व आपदा संस्थेचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन कडून तलावात शोध मोहीम चालू आहे. घटनेच्या 24 तासानंतरही अद्याप पर्यंत शोध लागला नाही.(vnsnews-24, feature, jintur) 





याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अंबरवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव यदाजी जाधव वय 60 वर्ष हे शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात जात असताना धरणाच्या बॅकवॉटर मधून जावे लावत असल्यामुळें स्वतःच्या तरफयातून जात असताना पाण्यात पडले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.




यावेळी पाण्याच्या काठावर तराफा व टोपी आढळून आली असल्यामुळे पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला देताच घटनास्थळी नायब तहसीलदार नागेश देशमुख, मंडळ अधिकारी आत्माराम जाधव सपोनि कृष्णा धायवट, एपीआय ननावरे दाखल झाले आहेत. 



यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व आपदा संस्थेचे प्रतिनिधी यांच्या मार्फत पाण्यात शोध मोहीम राबवली जात आहे.  घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.








Post a Comment

0 Comments