Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  शिक्षक पात्रता परीक्षा पात्र प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण




परभणी ➡️ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडलेल्या परीक्षेचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पात्र परीक्षार्थींना जिल्हा परिषद परभणी येथे ६ एप्रिलपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा) विठ्ठल भुसारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 





या परीक्षेतील पेपर क्र. १ (इयत्ता पहिली ते पाचवी) व २ (इयत्ता सहावी ते आठवी) चा अंतिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. पात्र परीक्षार्थीना संबंधित विभागातून सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत (शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) उपलब्ध असून हे प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवारांनी आपले शैक्षणिक, व्यावसायिक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र इ. मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. 



ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक

उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत, डी. टी. एड. उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (असल्यास), दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास), माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, आणि ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.) सोबत आणणे आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी भुसारे यांनी कळविले आहे. 





Post a Comment

0 Comments