Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  भाजपाची राहुल गांधींवर सुडबुध्दीने केली कारवाई - माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण




परभणी ➡️ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भुमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे असा आरोप करत या लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी दडपशाहीविरोधात सर्वांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.(vnsnews-24, feature, parbhani ) 



काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावुन त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ तसेच मोदींनी लोकांचा कष्टाचा पैसा आणि राष्ट्राच्या संपत्तीची सुरू केलेली उघड लूट याविरोधात लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘जय भारत सत्याग्रह' चा शुभारंभ केला आहे. या निमित्ताने परभणी येथे शुक्रवारी (दि.31) आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी काँग्रेसची भुमिका मांडली. 




यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर, परभणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सुरेश वरपूडकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.तुकाराम रेंगे पाटील, माजी आ.सुरेश देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, भगवानराव वाघमारे, रामप्रसाद घाटगे, बाळासाहेब देशमुख, सुरेश नागरे, रवि सोनकांबळे, महिला जिल्हाध्यक्षा जयश्री खोबे, मलेका गफार, विनोद कदम, पवन निकम, अमोल जाधव, सुहास पंडीत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर आकसाने व तेही गुजरातमधून कारवाई केली आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष वरच्या न्यायालयात धाव घेईलच परंतु राहुल गांधी आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पराभवाची भिती वाटू लागली आहे. राज्यातील विधान परिषद व विधान सभा पोटनिवडणुकीतही त्याचा प्रत्यय आलेला आहेच. म्हणूनच पराभव दिसू लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाया सुरु आहेत. 



भाजपाच्या अशा कारवायांविरोधात काँग्रेसही चोख उत्तर देईल. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभर विविध भागात जागृती करून जनतेला वस्तुस्थिती सांगण्यात येईल.आ.चव्हाण यांनी पुढे बोलताना सांगितले की, केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून सातत्याने लोकशाहीची गळचेपी होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असून हा  राजकीय षडयंत्राचाच एक भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. 




संसदेत राहुलजींचा आवाज बंद करण्यासाठी भाजपच्या सत्ताधारी सदस्यांनीच गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्याचे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. देशात असो की राज्यात सभागृहातही बोलू द्यायचे नाही आणि बाहेरही बोलू द्यायचे नाही. मग जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडायचे तरी कुठे? असा सवाल त्यांनी केला. सभागृह चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी सदस्यांची असते या अरुण जेटली यांच्या काही वर्षापूर्वी केलेल्या विधानाची भाजप सरकारला आठवून करून देण्याची वेळ आली असल्याचा आ.चव्हाण यांनी यावेळी लगावला.






Post a Comment

0 Comments