Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ प्रभावती नगरी रामनामाच्या गजराने दुमदुमली






परभणी ➡️ राम नवमीच्या निमित्ताने गुरुवार 30 मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ते शनिवार बाजार पर्यंत रॅली काढण्यात आली. यात दोन भव्यदिव्य शोभायात्रांनी, या यात्रेतील भगवे फेटेधारी युवक, युवती व हजारो रामभक्तांच्या रामनामाच्या गजराने, अभूतपूर्व जल्लोषाने मध्यवस्तीसह प्रभावती नगरी अक्षरशः दुमदुमली. एका सरस एक रामायणातील वेशभूषा, सुंदर व आकर्षक असे पौराणिक देखावे रामभक्तांकरीता लक्षवेधी ठरले. 




यावर्षीच्या राम नवमीच्या शोभायात्रेतील रामभक्तांचा जल्लोष अक्षरशः वाखाणण्याजोगा होता. गेल्या 15 दिवसांपासून या दोन्ही शोभायात्रांच्या दृष्टीने विविध पक्ष, संघटना, संस्था तसेच प्रतिष्ठानांसह रामभक्तांनी अभूतपूर्व तयारी सुरु केली होती. त्यामुळेच या दोन्ही शोभायात्रा परभणीकरांच्या दृष्टीने पर्वणी ठरणार, हे स्पष्ट होते. सकाळपासूनच प्रभावती नगरी भगवे झेंडे घेवून, युवक रामनामाचा गजर करीत फिरत होते. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर जथ्येच्या जथ्ये दाखल होत होते. ‘जय श्री राम’ ‘प्रभु रामचंद्र की जय’ असा जयघोष करीत युवक नाचत, बागडत होते.




भगवे झेंडे फडकवून काहींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर येथूनच एका पाठोपाठ एक दोन्ही शोभायात्रांना काही वेळेच्या अंतराने प्रारंभ झाला. तेव्हा रामभक्तांचा जल्लोष वाखाणण्याजोगा होता. अतीशय शिस्तबध्दरीत्या निघालेल्या या मिरवणूकीत हजारो युवक, युवती सहभागी होत्या. या दोन्ही शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अग्रभागी घोडेस्वार, त्यावर अश्‍वारुढ फेटधारी युवती व युवक, त्या पाठोपाठ बॅन्ड, सुंदर असे रथ व क्रमाक्रमाने देखावे, वेशभूषा साकारलेल्या कलावंतांचे जथ्ये रामभक्तांचे लक्ष वेधत होते. या मिरवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मार्गावर विविध पक्ष, संस्था, संघटनांनी रामभक्तांकरीता फराळाची, नाष्ट्याची व चहापाणाची व्यवस्था केली होती.





💠💠शिवसेनेची शोभायात्रा दणाणली💠💠

श्रीराम जन्मोत्सव समिती, शिवसेना-युवासेनेतर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्या निमित्त महानगरातून सायंकाळी 4 वाजता भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी गटनेते अतूल सरोदे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव बनसोडे, रमेश दळवी यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी या भव्य दिव्य शोभायात्रेनिमित्ताने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली होती. सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. 





या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभु श्रीरामांची भव्य आकर्षक मूर्ती, घोडेस्वार महिला, दिल्ली येथील अघोरी नृत्य पथक, पुणे येथील सुप्रसिध्द डिजे, दिल्ली येथील भव्य सजीव बजरंगबलीचा देखावा, सातारा येथील मल्लखांब पथक, सोलापूर येथील हलगी पथक, रामजी व सिताम्मा नृत्य पथक, श्रीरामजी व सितामाता यांचा सजीव देखावा लक्षवेधी ठरला. या मिरवणूकीतील सुंदर गीते, त्यावरील कार्यकर्त्यांचे नृत्य, जल्लोष, रामनामाचा गजर अभूतपूर्वच ठरला.




💠💠श्रीराम जन्मोत्सव समितीची भव्यदिव्य शोभा यात्रा💠💠

प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे गुरुवारी (दि.30) परभणी महानगरातून भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. मागील 9 वर्षा पासून रामभक्त मिळून ऐतिहासिक अशी भव्य शोभायात्रा काढत आले आहेत. येणार्‍या 1 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथील बहुप्रतिक्षित राम मंदिर सर्वांसाठी खुले होणार असून त्या अनुषंगाने यावर्षीची रामनवमी रामभक्तांच्या दृष्टीने विशेष व प्रचंड उत्साहात साजरी होणार हे स्पष्ट होते. श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे या निमित्ताने जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली असून शोभायात्रा भव्य दिव्य व्हावी म्हणून रामभक्तांनी भक्कम असे नियोजन केले होते.






या शोभायात्रेया अग्रभागी अश्‍व होते. शोभायात्रेत वासुदेव, गोंधळी, भजनी, वारकरी मंडळी, फेटेधारी महिला, भगवे ध्वज हातात घेतलेले युवक व लहान लहान वानरसेना सुध्दा शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होती. प्रभू श्रीराम यांची पालखी या शोभायात्रेचे आकर्षण ठरली. या शोभायात्रेत सोलापूर येथील प्रसिद्ध हलगी पथक, भगवा रंग उधळणारी मशीन, 16 फुटी सजीव हनुमानजी पाठोपाठ विविध पाच सजीव असे देवाचे देखावे हे अतिशय देखणे आणि नेत्रदीपक होते. 






मुंबई येथील लालबागचा राजांना ज्या बँडची सलामी असते तो स्वरांजली अव्वल दर्जाचा बँड शोभायात्रेत सहभागी होता. कोल्हापूर येथील मर्दानी खेळ पथक चित्तथरारारक खेळांणी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच मुंबई येथील सोनू मोनू हे भन्नाट पथक सर्वांना जय श्रीराम जय घोष करण्यास भाग पाडत होते. शोभायात्रेतील सहभागी सर्व पुरुष मंडळी जय श्रीराम लिखित टोपी परिधान करुन यात्रेत सहभागी झाले होते. या मिरवणूकीतील देखाव्यांपाठोपाठ कार्यकर्त्यांचा शिस्तपणा, जल्लोष अभूतपूर्वच होता.








Post a Comment

0 Comments