Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/येलदरी कॅम्प येथे मोठ्या उत्साहात श्री राम जन्मोत्सव साजरा




जिंतूर ➡️ श्री रामनवमी निमित्त जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथे महापुजेचे आयोजन तरुण युवकाच्या माध्यमातून करण्यात आले होते. (vnsnews-24, feature, parbhani ) 



रामनवमी निमित्त सामाजिक उपक्रम राबवत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येलदरी येथे मागील ३ वर्षांपासून तहानलेल्या नागरीकांना पाण्याची सोय व्हावी व तहानलेल्याची तहान भागावी यासाठी पाणपोई लाउन पाणपोईचे उदघाटन संभाजी ब्रिगेड सामाजिक जिंतूर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले व श्री प्रभु राम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय लष्करातील जवान मा. प्रशांत नवले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.



तसेच येथील हनुमान मंदिरात देखील दुपारी बारा वाजता श्री राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भजन, आरती ,पाळणा आदी कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने साजरे करण्यात आले या वेळी सर्व गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ समस्त गावकरी व पंचक्रोशीतील बांधवाणी उपस्थित राहून घेतला.






Post a Comment

0 Comments