Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  नितीन चषक क्रिकेट स्पर्धामध्ये विराट नांदेड व तुळशी परभणी अंतिम फेरीत दाखल




सेलू ➡️ सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त दि. २८ जानेवारी २०२३ शनिवार रोजी नूतन महाविद्यालय क्रीडांगणावर उपांत्य फेरीचा पहिला सामना मालेगाव वि तुळशी परभणी यांच्यात खेळला गेला. (vnsnews-24, sports, selu ) 




सामन्यात परभणी संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात १६७ धावांत ५ बाद .वैभव लांडे ३७ धावा, पुरोहित भारत ४२,तर जयदिप भराडे २१धावा केल्या. मालेगाव संघाचा भेदक मारा मुजम्मील खान व अझर अन्सारी १-१ गडी तर अबु साद २ गडी बाद केले. 




१६७ धावांचे प्रति उत्तर देताना मालेगाव संघाने २० षटकात ९ बाद १२८  धावा केल्या  यात नदीम अन्सारी ३१ , इरफान शेख २३, सलीक अन्सारी २३ धावा केल्या, तर परभणी संघाच्या वतीने  भेदक मारा  अमन भादोरीया ३ गडी तर जयदिप भराडे, आकाश कॉम्बो, पुरोहित भारत प्रत्येकी २-२ गडी बाद करून ३९ धावांनी दणदणीत विजय प्राप्त करत अंतिम फेरीत दाखल झाला. 




नितीन चषक क्रिकेट स्पर्धा २०२३: सामनावीर पुरस्कार व रोख १०००/- रोख पारितोषिक परभणी संघाचा पुरोहित भारत यास प्रदान करताना माजी उपनगराध्यक्ष  प्रभाकर सुरवसे, माजी आमदार हरीभाऊ काका लहाने, उपपोलिस निरीक्षक माधव लोलुकवार, अविनाश शेरे, कासीम भॉई, संभाजी पवार आदी उपस्थित होते.




दुपारच्या सत्रात दुसरा उपांत्य फेरीत विराट सी.ए. नांदेड शेफक बीड च्या सामना चे   साईबाबा बॅक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले याप्रसंगी बॅकचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, प्रभाकर सुरवसे, दत्तराव आंधळे, विनोद तरटे, कासीमभॉई, संयोजक गिरीष लोडाया हे उपस्थित होते. विराट नांदेड च्या संघाने 20 षटकात १६२ धावा करत सर्वबाद झाले. यात यश यादव २२ धाव संदिप पाटील २४, शहाबाज काझी ४९, तर उबेद खान २८  योगदान दिले.




बीड संघाच्या वतीने गोलंदाजी मारा करताना सय्यद सरफरोज व मो. वासिम  याने२-२ गडी  बाद केले. तर मुद्दस्सर मुल्ला ३ गडी बाद केले.१६२ धावांच्या प्रतिउत्तर देताना  शेफक बीड २० षटकात. १४५ धावांत  सर्व गडी बाद झाले.यात मुयोद्दीन शेख ३६, असिफ खान २५, प्रदिप जगदाळे १६, अजय काळे १८  धावांचे योगदान देऊ शकले.  विराट नांदेड संघाच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजी संदिप पाटील  ४ गडी,व शाहरुख काझी ३ गडी बाद  करून १७ धावांने विजय खेचून आणला.व अंतिम फेरीत प्रवेश केला. 




सामनावीर पुरस्कार नांदेड संघाच्या संदिप पाटील खांडेकर यास १ हजार रोख व चषक ऑर्किड मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉ.इम्रान कुरेशी यांच्या वतीने सामनावीर पुरस्कार रोख १००० रु देण्यात आला, याप्रसंगी ओमप्रकाश तोष्णीवाल, रवि कुलकर्णी, नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ काका लहाने,  आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव संदीप लहाने , विनायक खंडागळे, पांडुरंग कावळे, अविनाश शेरे,  स्पर्धा संयोजक:- गिरीश लोडाया, नागेश कान्हेकर, सहसंयोजक:-  हरिभाऊ काळे, गणेश माळवे, बंडु देवधर, यांनी परीश्रम घेतले.







Post a Comment

0 Comments