Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  जन्मदात्या बापानेच पोटच्या दोन जुळ्यांनाही पाजविले विष नंतर स्वत: घेतले विष




 

जालना ➡️ का कंपनी कामगाराने स्वतः विष प्राशन करून पोटच्या दोन जुळ्यांनाही विष पाजल्याची घटना जालना येथे घडली. त्या तिघांनाही उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले असता संबंधित व्यक्तीचा शनिवारी (दि.28) मृत्यू झाला. (vnsnews-24, crime, jalana ) 




भागवत पंजाजी काळे (३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भक्ती आणि वेद अशी उपचार सुरू असलेल्या जुळ्यांची नावे आहेत. या मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.भागवत काळे हे शहरातील एका कंपनीत काम करतात. सध्या ते जालना येथे वास्तव्याला आहे. शनिवारी सकाळी फिरायला जातो, असे सांगून घरातून निघाले. मात्र नंतर ते दोन्ही मुलांना घेऊन अंबड रस्त्यावर आले आणि तिथे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले. यानंतर स्वत: विष प्राशन केले.





तिघांना उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्‍यात आले. भागवत काळे यांचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. तर भक्ती आणि वेद या मुलांवर उपचार सुरु आहेत. जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: विष घेतल्‍याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र भागवत काळे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.







Post a Comment

0 Comments