Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत जवाहर विद्यालयाचा विद्यार्थी रुद्रप्रताप बळीराम वटाणे राज्यात प्रथम




जिंतूर ➡️ नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत जवाहर विद्यालयाचा विद्यार्थी रुद्रप्रताप बळीराम वटाणे हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 




या भव्य यशाबद्दल सांस्कृतिक कार्यक्रमात संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी के.डी. वटाणे, पोलीस उपनिरीक्षक कोरके साहेब, सतीश काळे, सुनीलजी काबरा, बालाजी शिंदे, डॉ.परमेश्वर कांगणे, सतीश आदमाने, संचालक किशनराव वटाणे, बांधकाम सभापती शामराव मते, प्राचार्य बळीराम वटाणे सर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते, राजेशजी वटाणे या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 




यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बळीराम वटाणे यांचा उपक्रमशील व कृतिशील मुख्याध्यापक म्हणून भूगोल प्रज्ञाशोध विभागातर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विभागप्रमुख व्ही.व्ही.गडदे, ए.यु.देवकते यांनी मार्गदर्शन केले होते. तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.







Post a Comment

0 Comments