Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  परभणी शहर महानगरपालिकेने जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा कार्यालय केले सील





♦️थकीत मालमत्‍ता कर रु. ४ लाख ४३ हजार पोटी कारवाई

परभणी ➡️ शहर महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक तृप्‍ती सांडभोर यांनी उपायुक्‍त व प्रभाग समिती सहायक आयुक्‍त यांना थकीत मालमत्‍ता कर व पाणीपट्टीची वसुली करण्‍याच्‍या सुचना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार उपायुक्‍त उत्‍कर्ष गुट्टे, प्रभाग समिती सहायक आयुक्‍त यांच्‍या मार्फत थकीत कराची वसुली करण्‍यासाठी मोहिम राबविण्‍यात येत आहे. मोठ्या प्रमाणात व अनेक वर्षांपासून मालमत्‍ता कर व पाणी पट्टी थकीत असलेल्‍या मालमत्‍ता धारकांकडून कर व पाणीपट्टी वसुल करणे, भरणा न केल्‍यास मालमतेची जप्ती/अटकावणी करण्‍यात येत आहे.  (vnsnews-24, gov, parbhani ) 




परभणी शहर महानगरपालिकेच्‍या प्रभाग समिती अ चे जप्‍ती पथक जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा कार्यालय येथे वसुलीसाठी गेले असता मालमत्‍ता धारकाने सन २०१७ पासूनच्‍या थकीत कराची रक्कम रु. ४,४३,८३४/- भरणा केली नाही. थकीत कराचा भरणा न केल्‍यामुळे जप्‍ती/अटकावणीची नोटीस बजावण्‍यात आलेली होती. 




पंरतू थकीत कराचा भरणा न केल्‍यामुळे आज दिनांक २७.०१.२०२३ रोजी जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा कार्यालय कार्यालय सिल करण्‍यात आले. सदरची कार्यवाही सहायक आयुक्‍त जुबेर हाश्‍मी, कर निरीक्षक विठ्ठल शेळके, रमेश कोल्‍हे, वसुली लिपीक सुनिल भराडे, अ. सत्‍तार, जावेद खान, सय्यद हमीद व ईतर वसुली लिपीक यांच्‍या पथकाने केली.




आयुक्‍त तथा प्रशासक तृप्‍ती सांडभोर व उपायुक्‍त उत्‍कर्ष गुट्टे यांनी जप्‍ती/अटकावणी नोटीस प्राप्‍त नागरीकांनी व शासकीय कार्यालयांनी जप्‍ती/अटकावणी पथक दाखल होण्‍यापुर्वी कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्‍याचे आवाहन केले आहे.





Post a Comment

0 Comments