Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  मोबाईलवर रील बनविताना दुचाकीचा अपघातील दुसऱ्या विद्यार्थीचा आज मृत्यू




शंतनु सोनवणे    /  स्वप्नील चव्हाण

परभणी ➡️ पाथरी तालुक्यातील डाकु पिंपरी येथील चार विद्यार्थी कानसुर येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयात प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणासाठी एकाच दुचाकीवर निघाले होते. सोशल मिडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी मोबाईलवर रील बनविताना दुचाकीवर जात असलेल्या या विद्यार्थ्यांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि.26) सकाळी अपघात झाला. (vnsnews-24, accident, parbhani ) 





पाथरी - सोनपेठ मार्गावर आज सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनासाठी पाथरीच्या कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयाकडे डाकू पिंपरी येथील नववीचे 4 विद्यार्थी एकाच दुचाकीवर जात होते. पण दुचाकीवर सोशल मिडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी मोबाईलवर रील बनविताना हा भीषण अपघातात झाला. 




यात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमीपैकी शंतनु सोनवणे या विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. तर स्वप्नील चव्हाण या विद्यार्थ्यांचा आज शुक्रवारी (दि.27) सकाळी ६ वाजता मृत्यू झाला आहे. इतर दोन गंभीर जखमीवर उपचार सुरु आहेत.





Post a Comment

0 Comments