Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/परभणी मनपाने वसूल केला कॅरी बॅग वापरणाऱ्यांकडून १५ हजार रूपयांचा दंड





परभणी ➡️ महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या नियंत्रणात प्रभाग समिती क अंतर्गत वसमत रोड शिवाजी कॉम्प्लेक्स येथे कॅरीबॅग वापरणाऱ्या ३ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.(vnsnews-24, feature, parbhani ) 





घनकचरा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ८ दुकानदारावर दंडात्मक कारवाई करून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कावाईत एकूण १९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक मेहराज अहमद, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, अब्दुल शादाब, प्रल्हाद देशमाने, सौरभ जोगदंड व मनपा कर्मचारी यांच्या पथाने कारवाई केली.




तसेच शहरातल तिन्ही प्रभागातील सहायक आयुक्ताना कॅरीबॅग वापरणारे भाजी विक्रेते, फळ विक्रेते व व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त सांडभोर यांनी दिले आहेत. (vnsnews-24, feature, parbhani ) 







Post a Comment

0 Comments