Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/लोकशाही म्हणजे परमत सहिष्णुता - डॉ.आर.डी.शिंदे




नांदेड ➡️  लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेची असते. भारतीय लोकशाही आणि संविधानाचे पालक नागरिक आहेत. भारतीय जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे माध्यम संविधान आहे. लोकशाही म्हणजे परमत सहिष्णुता असते; असे प्रतिपादन गोदावरी मनार महाविद्यालय, शंकरनगर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.डी.शिंदे यांनी केले. (vnsnews-24, feature, nanded) 




श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित व्याख्यानाला ते बोलत होते.




याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, रसायनशास्त्र विभागातील सेवानिवृत्त डॉ.ए.टी.सूर्यवंशी, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.मिरा फड, डॉ.बालाजी भोसले यांची उपस्थिती होती.



उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीरा फड यांनी केले तर आभार डॉ.एकनाथ मिरकुटे यांनी मानले. या व्याख्यानास प्रा.गौतम दुथडे, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.जी.बी. चौकटे आणि विद्यार्थी विद्यार्थिनीची बहुसंख्येने उपस्थिती होती. (vnsnews-24, feature, nanded) 





Post a Comment

0 Comments