Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ कृषीपंपधारकांशी सुसंवाद साधत ग्रामीण विभागाने केले २ कोटी ४२ लाखांचे वीजबील वसूल




✴️ तीन हजार ५७० शेतकऱ्यांनी केला चालू बीलांचा भरणा

नांदेड ➡️ कृषीपंपांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी हवी असणारी बीज खरेदी व रोहीत्रांच्या देखभालीसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी कृषीपंप धारकांकडे थकीत असलेले व चालू देयक वसुल करण्यासाठी महावितरण विविध माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. या सुसंवादाच्या प्रक्रियेतूनच महावितरणच्या नांदेड ग्रामिण विभागाने गेल्या दहा दिवसात तब्बल दोन कोटी ४२ लाख रूपयांची कृषीपंपाची वीजबिले जमा करण्यात यश प्राप्त केले आहे. शेतकऱ्यांच्या सकारात्कम दृष्टिकोणतूनच ही किमया शक्य झाल्याचे कार्यकारी अभियंता आर.पी.चव्हाण यांनी सांगीतले. 





कंधार, लोहा,मुदखेड व अर्धापूर तालूक्यांचा समावेश असलेल्या नांदेड ग्रामिण विभागाने सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार कृषीपंपाच्या वसुलीसाठी विविध माध्यमांचा वापर करत वीजबील वसुल होण्याची गरज ग्राहक मेळावे, बैठकांच्या सुसंवादातून पटवून दिल्यानंतर ग्रामिण विभागातील कृषीपंप धारकांनी सकारात्मकता दर्शवत चालू वीजबिलांचा तीन हजार ५७० शेतकऱ्यांनी तब्बल दोन कोटी ४२ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यासाठी विभागातील सर्व सहायक अभियंते, जनमित्र यांनी सुट्टयांच्या दिवशीही कार्यरत राहत वीजबील वसुलीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर व अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्ही अपेक्षीत यश प्राप्त करणे सोपे जात असल्याचे मत कार्यकारी अभियंता श्री आर.पी. चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.







महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच नागपूर येथे बैठक घेत महावितरणची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगीतले. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले असून नवीन कायद्यानुसार कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. अशा वेळी वीजबिलांची वसुली अत्यावश्यक झाली आहे. त्यामुळे वसुलीशिवाय आता पर्याय नाही असे स्पष्ट करत चालू वीज बील भरण्यासाठी कृषीपंपधारकांना प्रवृत्त करावे अन्यथा वीजपुरवठा खंडीत करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील अखंडीत वीजपुरवठयासाठी चालू देयक भरावे असे आवाहन महावितरणने केले आहे.



स्वर्गिय विलासराव देशमूख अभय योजने अंतर्गत कलंबर सहकारी साखर कारखान्याने सहभाग नोंदवत थकीत रक्कम एक लाख ६४ हजार ९८२ रूपयांचा एकरकमी भरणा केला आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी कार्यकारी अभियंता आर.पी.चव्हाण यांना वीजबिलाचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता सचीन दवंडे, सहायक अभियंता शिवाजीराव वाघमारे उपस्थित होते.


 


विलासराव देशमूख अभय योजने अंतर्गत कलंबर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी कार्यकारी अभियंता आर.पी.चव्हाण यांना वीजबिलाचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी इतर अधिकारी.




Post a Comment

0 Comments