Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस रक्तदान शिबिराने संपन्न





नांदेड ➡️ राष्ट्रीय छात्र सेना (NCC) ही देशांतर्गत संकट समयी नागरी संरक्षण व नागरी सेवासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. २६ नोव्हेंबर १९४८ ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. (vnsnews-24, education, nanded) 




याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. महाविद्यालयीन तरुणाच्या मनात देशभक्तीचे पुलिंग चेतवणे राष्ट्रनिष्ठा व राष्ट्र निर्माण प्रति एक आदर्श नागरिक एनसीसीच्या माध्यमातून घडवला जातो त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच या संघटनेचा उद्देश आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिवस संबंध भारतभर उत्साहात साजरा केला जातो. 





यशवंत महाविद्यालयात देखील राष्ट्रीय छात्र सेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. फिफ्टी टू महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल यम रंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन .शिंदे, माजी प्र-कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, 52 महाराष्ट्र बटालियन नांदेड एनसीसीचे प्रशासकिय अधिकारि (AO) लेफ्टनंट, कर्नल व्हेटरी वेलू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रक्तदान विषयीचे महत्व प्रतिपादन करण्यात आले व विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याविषयी मोटिवेट करण्यात आले.





या वेळी 52 महाराष्ट्र बटालियन नांदेड एनसीसीचे प्रशासकिय अधिकारी (AO) लेफ्टनंट, कर्नल व्हेटरी वेलू यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सुभेदार चौगुले साहेब आणि त्यांचे सहकारी हे देखील उपस्थित होते. आदरणीय लेफ्टनंट, कर्नल व्हेटरी वेलू व सुभेदार चौगुले स्वतः रक्तदान केले व विद्यार्थ्यापुढे आदर्श निर्माण केला तसेच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरात रक्तदान  करून सहभाग नोंदवला. 






कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. एन.शिंदे यांनी रक्तदान हे अत्यंत पवित्र कार्य असून प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केले पाहिजे असे आपल्या स हकार्‍यांशी चर्चा करताना मत व्यक्त केले. आपण सुद्धा महाविद्यालयीन जीवनात एनसीसीचे छात्र राहिलो होतो याची प्राचार्यांनी प्रखरपणे आठवण करून दिली.





या कार्यक्रमाचे आयोजन व बंदोबस्त एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. आर .पी .गावंडे यांनी केले. त्यांनी सुरुवातीला एनसीसी दिवसाचे व  रक्तदानाचे महत्व विषद केले. यावेळी एनसीसी कॅडेट्स सोबतच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रेरणा घेऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले विशेष म्हणजे एनसीसी मधील विद्यार्थिनी यांनी देखील रक्तदान करून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी देखील करण्यात आली. 




यावेळी महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. त्याच बरोबर  डॉ. किशोर इंगळे केयर टेकर ऑफिसर नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय नांदेड यांनी देखील रक्तदान केले. यावेळी नांदेड शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय आणि यशवंत महाविद्यालयातील अनेक कॅडेट उपस्थित होते.







या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  शिबिरा साठी आधार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनसीसी कॅडेट गौरव बोकारे, वाघमारे, मुंडे विद्यार्थिनी क्रेडिट राजनंदिनी वाघमारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.(vnsnews-24, education, nanded) 






-




Post a Comment

0 Comments