Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सौ झूठ एक सच हा सिनेमा दाखवून दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली




परभणी ➡️ रविवार दि. 27 नोव्हेंबर रोजी परभणी फिल्म क्लबच्या कार्यक्रमात बाप्पादित्य रॉय दिग्दर्शित सौ झूठ एक सच हा सिनेमा दाखवून दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (vnsnews-24, feature, parbhani ) 






कैझन पिक्चर्स, आरभाट फिल्म क्लब, श्री शिवाजी महाविद्यालय आणि ज्ञानसाधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हॉटेल ग्रीन लीफ यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या परभणी फिल्म क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बी. यू.जाधव, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे मा. शिवसांभदादा सोनटक्के यांची उपस्थिती होती.




उद्योजक विक्रांत प्रधान यांच्या घरी आत्महत्येचा तपास करण्यासाठी एका रात्री पोलीस ऑफिसर येतो आणि या आत्महत्येला सर्व कुटुंबीय कसे जबाबदार आहेत हे सांगत प्रत्येक व्यक्तीचं अंतरंग उलगडत जातो. त्यांचे अंतरंग उलगडत असतांना नकळतपणे  आपण आपल्या अंतरंगाचा ठाव घेवू लागतो जणू काही आपणच त्या कुटुंबाचा भाग आहोत. सिनेमा आपल्याला सोबत घेवून पुढे जातो आणि एका अनपेक्षित, आश्चर्यकारक शेवटाला आपण सामोरे जातो.




असा आशय असलेल्या या पुरस्कार प्राप्त सिनेमात विक्रम गोखले, मामूटी, लिट्टी दुबे, जॉय सेनगुप्ता, नेहा दुबे, किरण जिंजानी आदींच्या भूमिका होत्या. परभणीतील रसिक प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सिनेमाचे कौतुक केले.





तसेच परभणीतील नवोदित अभिनेत्री मृणाल डिघोळकर चा नवा मराठी सिनेमा साथ सोबत येत्या 13 जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे त्या निमित्ताने तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व चित्रपटाच्या यशासाठी तिला शुभेच्छा पण देण्यात आल्या. 




नुकत्याच सुरु असलेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत परभणीच्या बालाजी दामूके निर्मित अतुल साळवे दिग्दर्शित दोन अंकी नाटक दानव चे उत्कृष्ट रित्या सादरीकरण झाले, या कार्यक्रमात दानव टीमचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून नाटकाच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.




कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी फिल्म क्लब चे रवि पाठक यांनी केले. सूत्रसंचालन व आभार त्र्यंबक वडसकर यांनी मानले.या कार्यक्रमाला परभणीतील सिने रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतुल साळवे, सोहम खिल्लारे, रुपाली पाठक, ऐश्वर्या कामतीकर, व्यंकटेश कदम, शंकर मोहिते, गणेश डुकरे,  आदींनी मेहनत घेतली.(vnsnews-24, feature, parbhani ) 





Post a Comment

0 Comments