Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ अ‍ॅग्रोनॉमी पी.एच.डी सीईटीत महाराष्ट्रात प्रिया पंजाबराव शिंदे प्रथम




परभणी ➡️ येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एमएसस्सी अ‍ॅग्रोनॉमी विषयाच्या विद्यार्थ्यांनी प्रिया पंजाबराव शिंदे(देशमुख )यांनी सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या पिएच़डी़ सीईटी  निकालात अ‍ॅग्रोनॉमी विषयात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. (vnsnews-24, education, parbhani ) 





परभणी शहरातील रहिवासी असलेल्या प्रिया शिंदे यांचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एम़एसस्सी़अ‍ॅग्रोनॉमी विषयात शिक्षण पूर्ण झाले असून त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER) तर्फे घेण्यात आलेल्या MCAER Phd CET 2022 (AGRONOMY) ही १३ नोव्हेंबर  रोजी सीईटी दिली होती.




या सीईटीचा निकाल सोमवारी दि. २८ रोजी जाहीर झाला आहे़.यामध्ये प्रिया शिंदे हिने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे़. त्याचप्रमाणे  तिने ASRB द्वारा घेण्यात येणाऱ्या NET परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल प्रिया शिंदे  यांचे सर्वस्तरातून अभिनदंन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.(vnsnews-24, education, parbhani ) 







Post a Comment

0 Comments