Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  डॉ. मोहम्मद रजा खान मोहम्मद अब्दुल सत्तार खान यांचा लोकश्रेय मित्र मंडळच्यावतिने सत्कार




परभणी ➡️ परभणीचे भुमीपुत्र आर्किटेक्ट अन्वर या नावाने सर्व परीचीत मनमिळावु असलेली व्यक्ती मोहम्मद रजा खान मोहम्मद अब्दुल सत्तार खान यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून सिव्हिल इंजनीयरींग या नावाची पी. एच.डी प्राप्त केल्याने लोकश्रेय मित्र मंडळाच्यावतिने सत्कार करण्यात आला आहे. (vnsnews-24, feature, parbhani ) 



    

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगरसेवक सय्यद नौमान हुसेन कौसर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कृषी अधिकारी बाबु भाई करीम भाई होते. यावेळी प्रस्ताविक लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केले तर सूत्रसंचलन अब्दुल जब्बार बेलदार यांनी केले.





यावेळी सय्यद नौमान हुसेन कौसर सलीम इनामदार यांच्यासह मान्य वरांची समयोचित भाषणे झाली तर सत्काराला उत्तर देताना डॉ. रजा खान यांनी हे प्रत्यक्ष क्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय लोकश्रेयाचे कार्य हे प्रेरणादायक असून नेहमीच स्मरणार्थ राहिल असे उत्तर दिले. आभार प्रदर्शन सय्यद गुडडु यांनी मानले या कार्यक्रमात रौफ खान यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. (vnsnews-24, feature, parbhani ) 








Post a Comment

0 Comments