Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सावंगी (म्हाळसा) येथे आवतरली जेजुरी, भाविकांनी घेतले खंडोबा - म्हाळसादेवीचे दर्शन




जिंतूर ➡️ तालुक्यातील सावंगी  (म्हाळसा) येथे आवतरली जेजुरी. आज 29 नोव्हेंबर रोजी येलदरी धरण परिसर सावंगी (महाळसा) येथे चंपाषष्ठीमी मार्तंड भैरव अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज यात्रेच्या निमित्ताने खंडोबा - म्हाळसादेवी मंदीरची सजावट केली. 







आज 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता मार्तंड जय घोष व ओम नमः शिवाय जप नामस्मरण दिंडी काढली. गावात जेजुरी अवतरली होती. सकाळ पासून गावात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती.  सकाळी 10 वाजता आरत्या पुर्ण गावातुन डिजेच्या तालावर फेरी काढली. 




यात समोर महिलांनी नामस्मरण दिंडी होती तसेच गावातील सर्व नागरिकांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि सवाकुंटल भंडार्याची उधळन केली सर्व वातावरण पिवळ मय झाल होते. पंचक्रोशीतील नागरिक दिवसरभर दर्शनासाठी गर्दी होती. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील अनेक जेष्ठ मान्यवरांनी तसेच तरुण युवकांनी व लहान मुलांनी सहभाग घेतला.







Post a Comment

0 Comments