Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पांगरी येथे किरकोळ वादातून तीक्ष्ण हत्यारांने महिलाची हत्या तर दोन जण गंभीर जखमी




जिंतूर ➡️ तालुक्यातील पांगरी येथे किरकोळ वादातून तीक्ष्ण हत्याराने तिघांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला व मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. ही घटना पांगरी या गावात दि. 29 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 7. 30 वाजेच्या घडली. (vnsnews-24, crime, jintur ) 







पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील पांगरी येथे 29 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वा. सु. आरोपी राजू विश्वनाथ बुधवंत याच्या घरासमोर अंगणात मयत सत्यभामा नागोराव मुंडे (वय 35, रा. जलालपूर ता. औढा, जि. हिंगोली) व त्याची मैैत्रणी अशामती फकीरा बुधवंत (45) यांनी आरोपी राजू विश्वनाथ बुधवंत यास विक्री केलेल्या प्लॉटला दोन्ही बाजूने रस्ता का देत नाही. या कारणावरून व ऋषिकेश सांगळे यास केलेल्या शिवीगाळी बाबत विचारणा केली. 





त्यामुळे रागाने आरोपी राजू विश्वनाथ बुधवंत यांनी शिवीगाळ करून त्यांनी त्याची जवळील चाकूने सत्यभामा नागोराव मुंडे यांचे छातीवर वार करून जिवे ठार मारले. तसेच दुसरा आरोपी गोविंद राजू बुधवंत यांनी ऋषिकेश सांगळे (18) यास काठीने डोक्यात मारून जखमी केले. अशामती हे भांडण सोडवण्यासाठी आली असता राजू विश्वनाथ बुधवंत यानी तिच्यावर चाकूने वार करून जखमी केेेेले.








 


त्यांना रुग्णालयात डॉ.गरड, सिस्टर हरकळे, सिस्टर मते, रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे, आदींनी उपचार केले दरम्यान डाॅ.गरड यांनी तपासून सत्यभामा नागोराव मुंडे (जलालपुर ता.औढा जि.हिगोली ) या महिलेस मृत घोषित केले. तर अशामती फकीरराव बुधवंत (पांगरी ता.जिंतूर) यांच्या पोटात तीक्ष्ण हत्यार खुपसल्याने अती रक्तस्राव होत असल्याने प्रकृती खालवत असल्याने, ऋषिकेश नाथराव सांगळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने या दोघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.




या संबंधीत फिर्यादी हनुमान मल्हारराव घुगे (30) यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू विश्वनाथ बुधवंत आणि गोविंद राजू बुधवंत यांंच्या विरोधात जिंंतूर पोलिस ठाण्यात कलम 462/2022 कलम 302,307,324,504,34 भा.द.वी अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आले.(vnsnews-24, crime, jintur ) 


 





Post a Comment

0 Comments