Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ मनोरुग्ण पतीने केले पत्नीचे शीर धडावेगळे, आरोपी ताडकळस पोलिसांच्या ताब्यात





परभणी
➡️ पुर्णा तालुक्यातील ताडकलस पोलिस ठाण्याअंर्तगत  कमलापुर येथे मनोरुग्ण पतीने आपल्या घरातच कोयत्याने सपासप वार करून पत्नीचे शीर धडावेगळे केल्याची भयानक घटना 29 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या संदर्भात पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी दिली आहे. (vnsnews-24, crime, parbhani) 






पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दित कमलापुर येथील मयत आशाबाई केशव मोरे हिला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मंगळवारी रात्री कुटुंबीय नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री नऊ ते दहाच्या सुमारास केशव मोरे याने हातात धारदार कोयता घेऊन पत्नी आशाबाई मोरे हिच्या चेहऱ्यावर वार करून चेहरा विद्रुप करत शीर धडावेगळे केले. यानंतर आरोपी कोयता आणि पत्नीचे शिर हातात घेऊन फिरत होता. कोणीच आरोपी जवळ जाण्याचे धाडस केले नाही.



 

 या घटनेची माहिती ताडकळस पोलीसांना मिळताच सपोनि विजय रामोड, संभाजी शिंदे, संतोष चाटे, काळे, दिपक बेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आशाबाई यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेवून परभणी येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेला. या भयानक घटनेमागील कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.  (vnsnews-24, crime, parbhani) 


.




Post a Comment

0 Comments