Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ३१ डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार अभियान जल जीवन मिशन अंतर्गत विविध कामांची होणार अंमलबजावणी





परभणी ➡️ जल जीवन सर्वेक्षण २०२३ अंतर्गत जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिंग पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच ( एफटीके किट ) द्वारे तपासणी व त्याबाबतचे प्रशिक्षण घेणे तसेच यासारख्या विविध बाबींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. (vnsnews-24, gov, parbhani ) 




जल जीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारे स्वच्छ जल से सुरक्षा अभियान १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल ॲप द्वारे अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठा योजना , रेट्रो फिटिंग मधील पाणी पुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधी मधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे तसेच सर्व पाणी नमुने जल सुरक्षका मार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.





एफटीके किट द्वारे कशा पद्धतीने पाण्याची तपासणी करावी याबाबत गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर त्यांची नावे अपलोड करण्यात येणार आहेत  स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानाचे नोडल अधिकारी म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व) हे काम पाहतील तर कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.), जिल्हा वरिष्ठ भू वैज्ञानिक, कार्यकारी अभियंता (मजिप्रा), उप अभियंता, शाखा अभियंता अभियानाची अंमलबजावणी करतील. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील अधिकारी - कर्मचारी अभियानाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करतील. 






१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा अभियानामध्ये हर घर जल या मोबाईल अॕपद्वारे जिल्ह्यातील अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजना व दुरुस्ती करण्यात येणाऱ्या योजनेतील मुख्य स्त्रोत यांचे जीओ टॕगींग करुन प्रयोगशाळेत व गावातील ५ महिलांच्या माध्यमातून एफटीके किटच्या माध्यमातून पाणी नमुन्यांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार यांनी केले आहे. (vnsnews-24, gov, parbhani ) 






Post a Comment

0 Comments