Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ध्येय निश्चिती केल्याशिवाय यश प्राप्ती होणार नाही - रामेश्वर पवार





परभणी ➡️  विद्यार्थ्यांची पदवी ही पहिली शिदोरी आहे. या शिदोरीचा उपयोग चांगला केला पाहिजेत. त्याचबरोबर ध्येय निश्चित केल्यास यश प्राप्त होते,असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य रामेश्वर पवार यांनी आज येथे केले. (vnsnews-24, education, parbhani ) 






स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत गंंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ आनंद घन यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यभान पवार महाविद्यालय तथा नवनिर्वाचित सिनेट सदस्य रामेश्वर पवार, संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर, परीक्षा प्रमुख डॉ. उत्तम देवकते, सहाय्यक परीक्षा प्रमुख प्रा. अभय पाटील, ज्ञानोपासक महाविद्यालयाचे आर. बी. क्षीरसागर, डॉ विठ्ठल डुमनर, डॉ. सरवदे, डॉ. नर्सिंगदास बंग, डॉ. तुकाराम बोबडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्वामी रामानंद तीर्थ, व डॉ. शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. 




यावेळी रामेश्वर पवार म्हणाले,"पदवी मिळाली म्हणजे आपण आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी पार पाडली असा गैरसमज विद्यार्थ्यांनी करू नये,त्याला अभ्यासच करावा लागतो. पदवी मिळणे हा विद्यार्थ्यांचा पहिला पाया म्हणावा लागेल. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. कोतवाल होण्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा  द्यावी लागते. मानवांची ब्रेन क्षमता सारखीच असते. 





श्रीमंत झाला म्हणजे त्यांची ब्रेन क्षमता अधिक आहे, असे कारण होऊ शकत नाही. ब्रेन वाढविण्यासाठी वाचन, अभ्यास केला पाहिजे. ज्यांनी वाचन व चिंतन केले त्यांची ब्रेन क्षमता  चांगली असते. कुठलीही माहिती वरवरची न घेता ती सखोल आत्मसात केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 




मान्यवरांच्या हस्ते 32 विद्यार्थ्यांना पदवी वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  प्रा. अभय पाटील यांनी केले. सूत्रसंचलन  डॉ. संतोष हंकारे तर आभार  डॉ. तुकाराम बोबडे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.







Post a Comment

0 Comments