Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  वन्दे भारत ट्रेनचे निर्माता कोण ?







सुमारे 06 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , 2016 ची.

रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे.

पेशाने इंजीनियर होते.

त्यांच्या रिटायरमेंट ला केवळ  दोन वर्षे  बाकी होते.

सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे.

पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी  कि कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने ने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.

ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?

ते इंजीनियर म्हणाले, आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.

ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी 180 किमी धावणारी Spanish Talgo कंपनी च्या डब्यांची चाचणी सुरू होती.

चाचणी सफल होती पण ती कंपनी 10 डब्यांच्या गाडीसाठी सुमारे 250 कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा रही करारही करत नव्हती.

अशा परिस्थितीत या इंजीनियर ने संकल्प केला कि आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले Are You Sure, We Can Do It ?

उत्तर होते...

Yes Sir!

किती पैसे लागतील R&D साठी ?

फक्त 100 कोटी रु सर!

रेल्वे ने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. 

दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर  जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ट्रेन 18 म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.

आणि ठाऊक आहे या 18 डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला?

केवळ 97 कोटी! जेव्हा की Talgo केवळ 10 डब्यांच्या ट्रेनचे 250 कोटी मागत होती.

ट्रेन 18 भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हीरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे कि या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच  'सेल्फ प्रोपेल्ड' आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.

या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मनी. 

2018 मध्येच हे निवृत्त झाले.

या देशात ट्रेन 18 च्या यशासाठी कुणी या टीमचे कौतुक तर केले नाहीच  परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा वन्दे भारत म्हशीला धडकली आणि तिचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला तर सर्व वामपंथी आणि देशद्रोही ट्रेनच्या अपयशाच्या नावाने शंख करायला लागले  तेव्हा सुधांशु सरांना दु:ख झाले आणि त्यांनी एक इंटरव्हुत त्या ट्रेनच्या डिझाईनची वैशिष्ठ्ये सांगितली...

(vnsnews-24, feature ) 



Video पहा.....












Post a Comment

0 Comments