Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ विमा कंपन्यांची तालुकास्तरीय कार्यालये तातडीने सुरु





 💥कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते आदेश

💥विमा, महसूल व तालुका कृषि अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर

परभणी ➡️ कृषि मंत्री अब्दुल सत्तार हे परभणी जिल्हा दौ-यावर आले असता जिंतूर तालुक्यात शेतक-यांनी विमा कंपनी प्रतिनिधींकडून देण्यात येणा-या वागणुकीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर कृषि मंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विमा कंपनी प्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वय ठेवत शेतक-यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी संबंधित तालुकास्तरीय अधिका-यांचे संपर्क क्रमांक जाहीर केलेले आहेत.



जिल्ह्यातील शेतक-यांना आता पिक विम्याबाबत येणा-या अडचणी तात्काळ सोडविल्याऐ जाणार आहेत. कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रतिनिधीने प्रत्येक तालुकास्तरावरील कार्यालये तात्काळ सुरु केली आहेत. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. (vnsnews-24, feature, parbhani )



कृषि मंत्री सत्तार यांच्या दौ-यादरम्यान जिंतूर तालुक्यात पिक विमा कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचबरोबर जिल्हाभरात पिक विमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतक-यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. पिकविमा कंपनीचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसणे, शेतक-यांचा समक्ष व भ्रमणध्वनीवरून संबंधित कर्मचा-याचा फोनवर संपर्क न होणे, तसेच प्रत्यक्ष भेटी न घेणे, शेतक-यांच्या विमाविषयक तक्रारीचा तातडीने निपटारा न करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या होत्या. त्याबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा प्रतिनिधीला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.



त्या अनुषंगाने पिक विमासंबंधित कंपनीचे अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पिक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.



विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक किशोर वळसे (7208912084) आणि संतोष अशोकराव बेद्रे,  (7028213555), तर तालुका समन्वयक अर्जुन हरीभाऊ मोरे गंगाखेड (9767462257), आकाश हरिभाऊ अंबलिगे जिंतूर (9588482709)  शुभम रमेश कावळे, मानवत (9545995442), राजू लक्ष्मणराव खुळे, पालम  (9766030170),केशव ग्यानदेव शेळके, परभणी (9503493655), सतीश शुभाषराव बेद्रे, पूर्णा (9370199847), विनोद देवराव झाडे, सेलू (8830411415), आकाश राजाभाऊ मोरे, सोनपेठ (9146920614), सुरज ज्ञानोबा लाटे, पाथरी (8446342191) हे  विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत.



नित्यानंद मुंजाजी काळे, तालुका कृषी अधिकारी, परभणी (9767007688), आर. एच. तांबीले, पुर्णा (7218654769), जी. ए. कोरेवाड, सोनपेठ (9423173366), ए.जे. देशमुख, पालम (7057232305), पी.बी. बनसावडे, गंगाखेड (7588571115), एस.पी.काळे, जिंतूर (9422725727),पी. एस. नांदे, पाथरी (9423442160), डी.टी. सामाले, सेलू (9423774133) आणि पी. एच. कच्छवे, मानवत (9096595997) यांचा समावेश आहे.



एल. व्ही. खळीकर, नायब तहसिलदार, परभणी (8329150935), के. व्ही. मस्के, पूर्णा (8390247049), प्रकाश गायकवाड, सोनपेठ  (8208967814), आर. एन. पवळे, पालम, (8698184177), सुनिल कांबळे, गंगाखेड  (9049880750), ओमप्रकाश गौंड,जिंतूर (7276993051), संदीप साखरे, पाथरी (7720972431), प्रशांत थारकर,सेलू (9588607076), बी. आर. वटाणे, मानवत (8830650810) आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02452-226400 आहे. शेतक-यांना पिक विम्याशी संबंधित अडचणी आल्यास वरील विमा कंपनी प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी केले आहे.(vnsnews-24, feature, parbhani )







Post a Comment

0 Comments