Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  वाहतूक निरीक्षक आणि नियंत्रकाला शिवीगाळ करत मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल





जिंतूर ➡️ जिंतूर बसस्थानकावर बसच्या वेळेच्या वादातून दोन आरोपींनी वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रकाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी 28 ऑक्टोबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(vnsnews-24, crime, jintur)





पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर बस आगाराचे वाहतूक नियंत्रक विलास आघाव (53) हे 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिंतूर बसस्थानकात त्यांच्या केबिनमध्ये ड्युटीवर करत होते. दरम्यान, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजेच्या  सुमारास तहसीलच्या डोंगरताळ येथील संकेत वाकळे (22) आणि सतीश वाकळे (25) नावाच्या दोन आरोपी हे जिंतूर बसस्थानक येथे येऊन बस वाहतूक नियंत्रकाला विचारले कि नाशिक येथे जाणारी बस आहे का ? 






तेव्हा मी त्यांना सांगीतले कि दोन बसेस गेलेल्या आहेत व यानंतर संध्याकाळी 06 वाजताचे सुमारास नाशिक जाण्यासाठी बस आहे. तेव्हा संकेत वाकळे मला म्हणाला की मला तुझी शुटींग करू दे व तु कँबीनच्या बाहेर ये. तेव्हा मी चौकशी ऑफीसच्या बाहेर येताच संकेत वाकळे यांनी करून माझी शर्टची काँलर धरून गचांडी दिली व सतिष उत्तम वाकळे यांनी माझे गालात चापट मारून मला शिवीगाळ केली.





या मारहाणीचा आवाज ऐकुन माझे वरिष्ठ भगवान पांडुरंग चिबडे रा.खैरी प्लॉट जिंतुर व संदिप पंडीत भांबळे रा.बामणी प्लॉट जिंतर  यांनी संकेत वाकळे व सतिष वाकळे यास समजावुन सांगत असतांना वाहतुक निरीक्षक भगवान चिभडे यांची दोघांनीही काँलर धरली. चिभडे हे कँबीन मध्ये गेले असता दोघेही कँबीन मध्ये जावुन पुन्हा शिवीगाळ केली. 




वरील दोघांनी आम्हास धकाबुकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. म्हणून जिंतूर बस आगाराचे वाहतूक नियंत्रक विलास आघाव (53) यांच्या फिर्यादीवरून आरोपी संकेत वाकळे व सतीश वाकळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (vnsnews-24, crime, jintur)








Post a Comment

0 Comments