Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणीत पोलिस कर्मचाऱ्यांनी साजरी केली सामाजिक दिवाळी





परभणी शहरात गरजूंना ब्लँकेट, कपडे वाटप, अन्नदान; व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जमवला मदतनिधी 

परभणी ➡️  पोलिस कर्मचाऱ्यांनी यांसदेखील सामाजिक दिवाळीचा उपक्रम राबविला आहे. उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.  याहीवर्षी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मित्र- मैत्रिणींच्या सहकार्याने दिवाळी निमित्त शहरात ब्लँकेट, कपडे वाटप, अन्नदान करण्यात आले. (vnsnews-24, feature, parbhani)




शहरातील सरकारी दवाखाना,रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर, शनी मंदिर परिसर, दर्गा रोड परिसर अशा विविध ठिकाणी गरजु, गरीब महिला, पुरुष यांना ब्लँकेट, लहान मुलांचे आणि मुलींचे कपडे वाटप तसेच अन्नदान (खिचडी, भजे, पुरी भाजी, खव्वा जिलबी) असा उपक्रम सलग तीन दिवस राबवून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. तसेच एका गरजु, होतकरू विद्यार्थ्याला स्पर्धा परिक्षेची पुस्तकं देऊन आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली.





या कार्यात संजय बर्गे (आरोग्य विभाग पुणे), बालाजी आबुज (कृषी विभाग परभणी), सचिन चाबुकस्वार (पोलिस कॉन्स्टेबल, परभणी), राजू गुठ्ठे (हिंगोली पोलीस), माणिक मांडे (परभणी पो.), रवी चव्हाण (ग्रामसेवक परभणी), अनिल कोंगुलवार, योगेश टाक, विजय वावळे, संजय खंदारे कारेगव, रवी देशमुख, सागर हरणे परभणी, कैलास बायनेवाड, प्रतिमा गवळी, सोहन जीनवाल (औरंगाबाद), लहू मामा डेरे (मुंबई), आनंदा पांचाळ, डॉ.चंद्रकांत खंदारे (औरंगाबाद), सुरेश मुटेकर, शीतल आगासे, संतोष दराडे, विकी राऊत, महेश अवचार (हिंगोली), जयदीप देशपांडे, सचिन धबडगे, शिवा पतंगे, रमेश ठोके, अनिल हींगोले, अनिल भराडे, आशा सावंत, अमोल साखरे (किनवट), कृष्णा अबुज (औरंगाबाद), महिंद्र खंदारे, गजानन कोंगुलवार (नांदेड), पांडुरंग वानखेडे,  नारायण सोनटक्के (बँड पथक हिंगोली), बालाजी रनेर, भागवत तिडके, राजेश वळसे (हिंगोली), अंकुश मस्के (कृषी विभाग परभणी), नितीन मोहरीर (पुणे), सोनिया बाहेती (बँगलोर), कामेश जोंधळे (नांदेड), बालाजी साठे, विशाल पवार, व्यंकटेश जंगीलवाड, रामा खटिंग, विकास चौरे, अजय वाटोरे, संघसेन कांबळे (वर्धा), किरण मोरे, प्रशांत गवळे, नितिन अग्रवाल (परभणी) या सर्वांनी महत्वाचे योगदान दिले आहे.(vnsnews-24, feature, parbhani)








Post a Comment

0 Comments