Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ उमाकांत पारधी व प्रमोद भलेराव यांनी पटकावला आयर्नमॅनचा किताब





जिंतूर
➡️  जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील कर्तबगार क्रीडाप्रेमी शिक्षक प्रमोद भालेराव व हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वयाच्या 50 शी नंतर  कोल्हापूर येथे झालेल्या जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅनच्या स्पर्धेत प्रथम प्रयासातच अद्वितीय यश संपादन केले आहे. यामुळे ते जिंतूर व सेनगाव तालुक्यात आयर्नमॅनचा 'किताब पटवणारे पाहिले  क्रीडा प्रेमी ठरले आहेत. त्यांच्या या यशा बद्दल जिंतूर तालुक्यातील सावंगी (म्हाळसा) ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (vnsnews-24, feature, jintur)

 

 

 

यावेळी येथील जेष्ठ नागरिक सुभाष अंबुरे व अजीज भाई यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावंगी (म्हाळसा) चे माजी सरपंच प्रमोद चव्हाण, जिल्हा परिषद चे माजी सदस्य विजय वाकळे, अनिल चव्हाण, संदीप चव्हाण, बाळू माकोडे यांच्या सह सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

 

 

 

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील  कर्तबगार तथा क्रीडाप्रेमी शिक्षक प्रमोद भालेराव व उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. पण यापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या त्यांच्या तळमळीने  त्यांना राहू दिलं नाही. म्हणून त्यांनी मनातील आयर्नमॅन होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी ज्ञान दानाच्या कार्याला न्याय देत स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत पूर्ण जिद्दीने व चिकाटीने सराव करून कोल्हापूर येथे रविवार 02 ऑक्टोबर रोजी आयोजित जगातील सर्वात कठीण हाल्फ आयर्नमॅनच्या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेकरिता संबंध भारतामधील तब्बल 750 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 

 

 

 

 

सहभागी स्पर्धकांना 2 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग करणे आणि 21 किमी धावण्याकरिता 10 तासांचा निर्धारित वेळ देण्यात आला होता. यात प्रमोद भालेराव व उमाकांत पारधी यांनी 53  मिनिटात 2 किमी पोहणे, 3 तास 27 मिनिटात 90 किमी सायकलिंग आणि 2 तास 53 मिनिटात 21 किमी धावण्याचा विक्रम करून केवळ 7 तास 51 मिनिटात स्पर्धा पूर्ण करून हाल्फ आयर्नमॅनचा 'किताब आपल्या नावे करून घेतला. त्यांच्या ह्या अद्वितीय यशामुळे ते तालुक्यात हाल्फ आयर्नमॅनचा 'किताब पटकवणारे पाहिले क्रीडा प्रेमी ठरले आहेत.(vnsnews-24, feature, jintur)

 

 

 

 

 




Post a Comment

0 Comments