Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ नाशिक जिल्ह्यातील मालेगावतून परभणीतील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या टोळीतील दोन आरोपी जेरबंद





🎯 परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई  

🎯 मास्टर माईंड टोळी प्रमुख आरोपीसह तीन आरोपी फरार 

परभणी ➡️ शहरातील नारायण चाळ कॉर्नर भागातील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच या टोळीतील मास्टर माईंड प्रमुख आरोपीसह फरार तीन आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी आज 29 ऑक्टोबर रोजी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. (vnsnews-24, crime, parbhani ) 



जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात माहितीनुसार दि. 22 ते 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान परभणी शहरातील नारायण चाळ  येथील “वर्ल्ड गिफ्ट मोबाईल शॉपी” दुकान फोडून अज्ञात 05 चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे गोबईल व ध्वनी उपकरण असा एकूण 202 मोबाईल्स किंमती 48 लाख 51 हजार 732 रुपयाचा माल चोरून नेल्यावरुन फिर्यादी राजेश चावला रा. नानलपेट परभणी यांचे फिर्यादीवरून पो.स्टे. नवामोंढा येथे 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 




या गुन्ह्यातील आरोपी अज्ञात असल्याने पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन परभणी शहरातील सीसिटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यासाठी मा.पोलीस अधिक्षक परभणी रागसुधा आर., अपर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, स.पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 04 पथके तयार करून सायबर शाखा व सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्यासाठी मालेगाव जि. नाशिक, जालना, माजलगाव, आष्टी, पाथरी, पुर्णा अशा ठिकाणी पथके रवाना केले.




दि. 28 ऑक्टोबर रोजी मालेगाव जि. नाशिक येथे तपास कामी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखा, परभणीचे पथकास गोपनीय माहिती मिळाल्यावरुन आरोपी 1) अफसरखान उर्फ पप्पू हबीबखान वय २१ वर्षे 2) शकील अहमद अब्दुल मजीद वय ३८ वर्षे दोघे रा. पवारवाडी पो.स्टे. वे समोर मालेगाव यांना मालेगाव येथे सापळा रचून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन विचारपूस केली.



त्यांनी सदर गुन्हयातील मास्टर माईंड टोळी प्रमुख आरोपी 3) अकबरखान उर्फ चौरचा पि.हबीबवान (वय 39 वर्षे) रा. अक्सा कॉलनी मालेगाव (पो.स्टे. रमजानपुरा), पचारचाड़ी पो.स्टे.चे समोर मालेगाव याने त्याचे साथीदार नामे 4) कैसरखान हबीबखान (वय 22 वर्षे) रा. पवारवाडी पो.स्टे. चे समोर मालेगाव 5) सय्यद हुसैन उर्फ सोनू सय्यद अली (वय 25 वर्षे) रा. शब्बीरनगर नांदेडी शाळेजवळ मालेगाव यांच्यासह सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली.




ही चोरी करण्यापूर्वी मास्टर माइंड टोळी प्रमुख आरोपी अकबरखान उर्फ चौरचा पि. हबीबवान याने या दुकानाची रेकी करून गुन्ह्यातील इतर साथीदारांना सहयोग हॉटेल धुळे रोड, मालेगाव येथे बोलावून परभणी येथे चोरीचा प्लॅन समजावून सांगितला. तर आरोपी सय्यद हुसैन उर्फ सोनू सय्यद अली याने कार आणली. ती घेऊन हे 05 आरोपी औरंगाबाद-जालना-देगावफाटा, सेलू-मानवतरोड मार्गे परभणी येथे अंदाजे 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06 वाजता शहरातील दर्गा रोडच्या मोकळ्या जागेत मैदानात थांबले.





तेथून गुन्ह्यातील मास्टर माइंड अकबरखान उर्फ चौरबा पि.हबीबखान व त्याचे साथीदार यांनी “वर्ल्ड गिफ्ट मोबाईल शॉपी पुनश्चः एकदा दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री 09 वाजता रेकी केली व दि.23 ऑक्टोबर रोजी सकाळी 04 वाजेच्या सुमारास कारमध्ये बसून साथीदारासह या दुकानाजवळ येऊन थांबले. नंतर या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून दुकनातील एकूण 202 मोबाईल्स किंमती 48 लाख 51 हजार 732 रुपयाचा माल चोरून नेला होता. नमूद दोन आरोपीतांच्या ताब्यातून तपासात त्यांचे हिश्यात आलेले मोबाईल व वनी यंत्र असा एकूण 04 लाख एक हजार 20 रुपयांचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 





त्यावरुन नमुद आरोपीतांकडे अधिक चौकशी करता त्यांनी खालील प्रमाणे महाराष्ट्रात व इतर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 1) परभणी जिल्हयात गंगाखेड, कोतवाली, नवामोंढा पोलीस स्टेशनचे हद्दीत विविध ठिकाणी चोरीत सहभाग असल्याची कबुली दिली आहे. 2) लातूर येथे एल. जी. शोरूम फोडून मुद्देमाल चोरून नेल्याची कबुली दिली आहे. 3) हैद्राबाद येथे दारूचे दुकान फोडून चोरी केली आहे. पोलीस अधिक्षक रागसुधा आर,  अपर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली खालील प्रमाणे 04 पथक गठीत करण्यात येऊन आरोपीतांचा अहोरात्र शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.






यात पोलीस उप निरीक्षक साईनाथ पूयड, पोह/ लुपसुंदरे, सय्यद मोचीन, पोना/दिलावर पठाण, पोशि/ राम पीळ चालक पोना / संजय घुगे २) पोलीस उप निरीक्षक नारोती चव्हाण, पोह/ विलास सातपुते, पोना / सिध्देश्वर चाटे, पोशि/ नामदेव दुबे, चालक श्रेपोउपनि मुस्कुटे, पोलीस उप निरीक्षक नागनाथ तुकडे, पोना / हरिचंद्र खुपसे, पोशि/ गायकवाड, चालक ४) पोलीस उप निरीक्षक श्री. व्ही. आर. कुसमे पोह/ रवि जाधव, परसोडे, पोना / रफीवोचीन शेख चापोह / निळे, सायबर पोलीस स्टेशन सपोनि गुलाब बाचेवाड पोह/ रेड्डी, गणेश कोटकर, पोना/ गौस, राजेश आगाशे, पोना / संतोष मोहळे, पवन आचार, व्यंकटेश नरवाडे यांनी आरोपी अटक करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन कामगिरी बजावली आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 








Post a Comment

0 Comments