Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | jintur | आडगाव दराडे येथे अज्ञातांनी सोयाबीनची गंजी जाळली, एक लाख रुपयाचे नुकसान





जिंतूर ➡️ तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या आडगाव दराडे तालुका सेलू शिवारातील अज्ञात व्यक्तींनी सोयाबीनची गंजी जाळून दिल्याची घटना दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 06 वाजण्याच्या पूर्वी घडली आहे.







पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अनुसार बोरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आडगाव दराडे येथील शेतकरी मधुकर शामराव दराडे यांनी शिवारातील गट नंबर 217 मधील शेत जमीन ठोक्याने केली होती. सोयाबीन पिकाची लागवड जून महिन्यात केली असता तब्बल 04 महिने सोयाबीन पिकाला लेकरावानी संगोपन केले होते.





सध्या सोयाबीन पाणी लागले असून मधुकर दराडे यांनी सोयाबीन कापणी करून शेतात गंजी लावली होती. ती गंजी दिनांक 28 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी 06 वाजण्याच्या अगोदर अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. यामध्ये अंदाजे 01 लाख रुपयाचे नुकसान झाले असून बोरी पोलिसांनी व तलाठ्याने पंचनामे केले आहे.









मधुकर शामराव दराडे यांच्या फिरदीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 435 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर गायकवाड हे करीत आहे.








Post a Comment

0 Comments