Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | sport | parbhani | गंगाखेड येथे पाच दिवशीय मोफत जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन





परभणी
➡️ परभणी जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीने व महारुद्र सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने दिनांक 01 / 09/ 2022 ते 05 / 09 / 2022 रोजी दुपारी ठीक 04 ते 07 वा. या वेळेत गंगाखेड येथे मुलांच्या आरोग्याकडे पाहून मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे या उद्देशाने 
जिम्नॅस्टिक खेळा चे भव्य असे पाच दिवशीय शिबीर गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध स्टार डान्स स्टुडियो येथे आयोजित करण्यात आले आहे.



शिबिराचे स्थळ :- स्टार डान्स स्टुडियो हॉल, कोद्री रोड, गंगाखेड

शिबिराचा कालावधी :- 01 / 09/ 2022 ते 05 / 09/ 2022

शिबिराची वेळ :- दुपारी 04 ते 07 वा.

संपर्क :- रुद्राक्ष जिम्नॅस्टिक अकॅडमी , गंगाखेड ( 7083902248)



यासाठी परभणी जिल्हा जिम्नॅस्टिक असो.चे सचिव उत्तमराव लटपटे व महारुद्र सेवाभावी संस्थे अध्यक्ष नामदेव मुंढे यांच्या पुढाकारणे हे शिवीर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पंच संदिप लटपटे व प्रदीप लटपटे काम करणार आहे.




या शिबिरासाठी रद्राक्ष जिम्नॅस्टिक अकॅडमी, गंगाखेडचे संचालक धनराज मुंढे यांनी अथक परिश्रम घेऊन या शिबिरासाठी पुढकार घेतला आहे. त्यासाठी त्यांचे सहकारी राधे आव्हाड, किरण सर , प्रताप भावे, शंतनू साळवे यांनी सहकार्य केले. 



या शिबिरासाठी तालुक्‍यातील सर्व खेळाडू यांनी उपस्थित रहावे व या शिबिराचा आनंद घ्यावा असे सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ आंधळे व महारुद्र मुंढे यांनी सांगितले. [vnsnews-24, sport, parbhani]






Post a Comment

0 Comments