Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | jintur | ग्रामविकास अधिकारी के.एन.खाडे यांच्या निलंबनाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेचा "जवाब दो" आंदोलन





जिंतूर ➡️ तालुक्यातील मौजे वरुड (नृसिंह) ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी के.एन.खाडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या कार्यवाही विरोधात आज 30 सप्टेंबर रोजी जिंतूर पंचायत समिती कार्यालयावर गटविकास अधिकारी यांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण आणि युवा जिल्हाध्यक्ष प्रितम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली "जवाब दो" आंदोलन करण्यात आले.


यावेळी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थिताना मराठवाडा युवाध्यक्ष किरण घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. 



ग्रामविकास अधिकारी के.एन.खाडे यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई रद्द करून जिंतूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यावर एट्रासिटी कायद्यानसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आली.





राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही निवेदन सादर.

के.एन.खाडे हे कर्तव्यदक्ष ग्राम विकास अधिकारी असून त्यांच्यावर राजकीय सुडापोटी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष श्याम सारंग यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.



 सदरील निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर वस्सा येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत. [vnsnews-24 ,feature, jintur]






Post a Comment

0 Comments