Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | nanded | शहीद भगतसिंग यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवा - नरेंद्र चव्हाण यांचे तरुणाईला आवाहन





नांदेड
➡️ शहीद भगतसिंग यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी राष्ट्रकार्यास प्रारंभ केला. देशासाठी मी काय करू शकतो? याचा आज सर्वांनी गंभीरपणे, अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. आज प्रत्येक जण प्रामाणिकपणे राष्ट्रसेवा, देशप्रेम व्यक्त करू शकतो. शहीद भगतसिंग यांचे बलिदान प्रत्येक भारतीयाने सदैव स्मरणात ठेवावे; असे प्रतिपादन युवा उद्योजक व रोजगार मार्गदर्शक श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी केले.



शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दि.२८ सप्टेंबर रोजी यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार 'शहीद भगतसिंग आणि आजचा युवक' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.



याप्रसंगी विचार मंचावर संस्थेचे कोषाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.



अध्यक्षीय समारोपात माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर म्हणाले की, युवकांना दिशादर्शक ठरणारे शहीद भगतसिंग जयंती सारखे कार्यक्रम आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे. शहीद भगतसिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. उद्याचा भारत कसा असला पाहिजे, याचे तरुणाईने आत्मशोधन करावे.



विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधताना पुढे नरेंद्र चव्हाण म्हणाले की, युवकांनी सदैव स्वतःशी संवाद साधायला शिकले पाहिजे. जे क्षेत्र आपल्या आवडीचे आहे त्यामध्येच करिअर करावे; तसेच आपला बी प्लॅनही तयार ठेवावा. प्रत्येक विधायक आणि रचनात्मक कार्याचा आनंद घेतला पाहिजे. आपण सर्वांनी स्वच्छतेचे तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. प्रामाणिकता, कर्तव्यदक्षता, तत्परता, सक्रियता, सत्यता यांची जोपासना म्हणजेच देशप्रेम होय. तरुणांमध्ये चिकित्सक वृत्ती, प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढली पाहिजे; असेही त्यांनी सांगितले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गव्हाणे यांनी केले आणि आभार डॉ.कविता सोनकांबळे यांनी मानले. यावेळी प्रगती तेलंग, प्रियंका मोटरगे, अस्मिता खंदारे या विद्यार्थिनींनी यथोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माधव भोसले, पिंगळे, बत्तलवाड,  नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.[vnsnews-24, education,nanded]






Post a Comment

0 Comments