Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | jintur | जि.प.प्रा.शाळा, सावंगी (म्हा) ते मज्जीद पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची राकाॅपाची मागणी





जिंतूर
➡️ तालुक्यातील सावंगी (म्हा) येथील जि.प.प्रा.शाळा ते मज्जीद पर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जि.प. सदस्य विजयकुमार वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना देण्यात आले. 




या निवेदनात जिंतूर सेनगाव रोडवरील सावंगी (म्हा) येथील जि.प.प्रा.शाळा.सावंगी (म्हा) ते मज्जीद पर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर एक ते दीड फुटापर्यंत खड्डे झाले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. 



सदरील रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजवून लवकरात लवकर पक्क्या रस्त्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सावंगी (म्हा) व हिवरखेडा शाखाच्यावतीने करण्यात येत आहे.



या निवेदनावर जि.प सदस्य विजयकुमार वाकळे, चेअरमेन मदन चव्हाण, गुलाब चव्हाण, उपसरपंच प्रभाकर चव्हाण,  दत्तराव चव्हाण, विक्रम वलेकर,  राजेश चव्हाण, धनंजय प्रधान, रामभाऊ चव्हाण , शेषराव महाळनर, सुभाष गायकवाड, किरण वाटोळे आणि सुरेश वाळका यांच्या स्वाक्षरी आहे. [vnsnews-24,feature, jintur]






Post a Comment

0 Comments