Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | parbhani | रस्त्याचे मजबुतीकरण माहेरवासीयांचा जलकुंभावर चढून आत्महत्येचा इशारा





परभणी
➡️ पूर्णा तालुक्यातील माहेर गावास जोडणार्‍या मुख्य रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे, या मागणीसाठी माहेर या गावच्या संतप्त ग्रामस्थांनी 30 सप्टेंबर रोजी शुक्रवारी जलकुंभावर ठाण मांडून आत्महत्येचा इशारा दिला.




बाणेगाव पाटीपासून या गावास जोडणार्‍या रस्त्याची अवस्था भयावह आहे. जिल्हा परिषदेने या रस्ते कामाकरीता जिल्हा नियोजन समितीतून 60 लाख रुपये देवू, असे आश्‍वासन दिले. परंतु, प्रत्यक्षात निधी मिळाला नाही, त्यामुळे कामही नाही. 



यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसांपासून ऐनकेन प्रकारे आंदोलने सुरु केली. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी हे ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले व सामुहिक आत्महत्येचा इशारा दिला.






Post a Comment

0 Comments