Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | gov | parbhani | बालपंगतीत आहार घेत सीईओ टाकसाळळेंनी साधला चिमुरडे आणि मुलींशी संवाद





परभणी
➡️ अंगणवाडी मधील बालके जेवणासाठी जेव्हा जेव्हा बाल पंगतीत बसतात तेव्हा तेव्हा ती भरपूर जेवण करतात असे दिसून येते हाच धागा पकडून बालकांनी रोजचा आहार पंगतीत बसूनच घ्यावा यासाठी जिल्ह्यात बालपंगतीच्या आयोजनाचा सुरुवात झाली असून अशाच बालकांच्या पंगतीत बसून सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी आहार घेत चिमुरड्यांसह किशोरवयीन मुलींशी संवाद साधला.



आज दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव व स्वच्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अंगणवाडी आणि शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून बालपंगत कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयातील सर्व अंगणवाडी मध्ये करण्यात आले आहे.



यावेळी महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी अरविंद आकात, पर्यवेक्षिका, सरपंच दगडू आप्पा काळदाते उपसरपंच ज्ञानेश्वर काळदाते, दिगंबरराव नाईक, सुरेश बेंडे, दादाराव कांबळे, ग्रामविकास अधिकारी तुकाराम साके, अंगणवाडी ताई, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.



याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अंगणवाडी मध्ये बालगोपाळांसोबत पंगतीत बसून संवाद साधत आहार घेतला, अंगणवाडी मधील परसबागेची पहाणी करून अंगणवाडी ताईंचे कौतुक केले तसेच जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली आणि किशोरवयीन मुलींशी बाल विवाह प्रतिबंधा बाबत संवाद साधला.



मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि बाल प्रकल्प विकास अधिकारी यांनी अंगणवाडीत जाऊन बालपंगतीत सहभाग नोंदवत अंगणवाडीतील सोयी सुविधांचा आढावा देखील देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण 1708 अंगणवाडीत बालपंगत आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात एकूण 3248 एवढ्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.



महिला व बाल विकास विभाग आयुक्त यांच्या निर्देशानुसार अंगणवाडी स्तरावर दि 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण माह साजरा करण्यात येतो. तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सूचनानुसार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने बालकांच्या पोषण व आरोग्य विषयी उपक्रम राबविण्यात येत आहेत.






Post a Comment

0 Comments