Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | gov | akola | सेवा पंधरवडा; शिबीरामध्ये अकोला येथे 49 तर बाळापूरात 104 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण




 

अकोला ➡️ सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, समाजकल्याणचे आयुक्त व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. 



त्याअनुषंगाने  गुरुवार दि.29 रोजी अकोला येथे आर.एल.टी. महाविद्यालय येथे तर बाळापूर तालुक्यात अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, बाळापूर येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये अकोल्यातील 49 तर बाळापूर तालुक्यातील 104 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.



बाळापूर तालुक्यात अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे बाळापूर व पातुर तालुक्याचे संयुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीरात अर्जदारांचे 105 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 65 प्रकरणाचे तपासण्या पूर्ण करण्यात आले. 



तसेच यापुर्वी बाळापूर व पातूर तालुक्यातून प्राप्त झालेल्या प्रकरणापैकी 104 प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्र या शिबीरात वितरण करण्यात आले.  तसेच अकोला येथे आर.एल.टी. महाविद्यालयामध्ये एकाच दिवशी अर्ज केलेल्या प्रकरणात त्याच दिवशी 49 जात वैधता प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तर शिबीरामध्ये 150 प्रकरणांची तपासणी करण्यात आले. या शिबीरामध्ये मोठया संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग सहभागी झाले होते.



या शिबीरामध्ये अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय बाळापूरचे प्राचार्य शेख मुख्तार, आर.एल.टी. महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य श्री. नानोटी येथे जिल्हा जात प्रमाणप पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, उपायुक्त विजय साळवे, संशोधन अधिकारी दिपा हेरोळे,  पोलिस निरीक्षक शुभांगी कोरडे, कर्मचारी आदि उपस्थित होते. 







Post a Comment

0 Comments