Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | parbhani | शिक्षक मतदार संघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर





परभणी
➡️ औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी 1 नोव्हेंबर, 2022 अर्हता दिनांकावर आधारित शिक्षक मतदार संघाच्या याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे.



शिक्षक मतदार संघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. यात दि. 1 ऑक्टोंबर, 2022 रोजी मतदार नोंदणीची जाहिर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. तर दि. 15 ऑक्टोंबर, 2022 रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पूर्नप्रसिध्दी करण्यात येणार आहे. दि. 25 ऑक्टोंबर, 2022 रोजी वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी केली जाणार आहे. 



दि. 7 नोव्हेंबर, 2022 रोजी नमूना 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम दिनांक असणार आहे. दि. 19 नोव्हेंबर, 2022 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाणार आहे. दि. 23 नोव्हेंबर, 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे. दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर, 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारले जाणार आहेत. 



दि. 25 डिसेंबर, 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. दि. 30 डिसेंबर, 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे. 



भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती जो औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात सर्वसाधारण रहिवासी असावा. तसेच दि. 1 नोव्हेंबर, 2022 मागील 6 वर्षापैकी एकूण 3 वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शिक्षण संस्थेत पुर्णवेळ अध्यापनाचे काम करीत असल्याचा अनुभव असणारे मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र असणार आहेत.



मतदाराने कागदपत्राच्या सर्व प्रती स्वप्रमाणित करणे अनिवार्य आहे. मतदारांनी आपले अर्ज (फॉर्म-19) मुख्यध्यापक यांच्यामार्फत किंवा स्वत: जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयात पदनिर्देशित अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करु शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी दिली.






Post a Comment

0 Comments