Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | jintur | सांस्कृतिक कार्यक्रमातुन सुप्त कलागुणांना वाव भेटतो - आमदार मेघना बोर्डीकर





🌼 आमदार मेघना बोर्डीकरां सह भावना,नयना, स्वप्ना व राधिका भगिनींनी घेतला गाण्यावर ताल

🌼 जिंतुरात रंगला नवरात्रोत्सव निमित्त दांडिया कार्यक्रम

🌼 महिला सह तरुणींची अलोट गर्दी,  दिपस्तंभ प्रतिष्ठाणचा पुढाकार

जिंतूर ➡️ आमदार मेघना बोर्डीकरांच्या पुढाकाराने  आयोजित शहरात नवरात्रोत्सव या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार मेघना बोर्डीकरांच्या मार्गदर्शनात दिपस्तंभ प्रतिष्टाणच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ज्या उपक्रमात विशेषतः महिला व विद्यार्थीनीच्या हिताचे सामाजिक बांधिलकी जपत असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्याचे त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याचे सतत प्रयत्न केले जातात. या वर्षी नवरात्रोत्सवा निमित्त खास महिलांसाठी आयोजित दांडिया कार्यक्रमा साठी  मुख्य आकर्षण हार्दिक जोशी ( राणादा) व अक्षया देवधर( अंजली)  फेम "तुझ्यात जीव रंगला" मधील सुप्रसिद्ध ही कलाकार आमंत्रित केली होती.




घरकामापासून थोडा विरंगळा भेटावा महिलांना व तरुणींना आपल्यातील सुप्त गुणांना व कला कौशल्यास अश्या सांस्कृतिक कार्यक्रमातून संधी भेटावी म्हणून दरवर्षी दीपस्तंभ च्या माध्यमातून असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्याच अनुषंगाने आज खास महिलांसाठी हा दांडिया चा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी प्रचंड उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना सांगितले.



सदरील कार्यक्रम बोर्डीकर पोतदार इंग्लिश स्कूलच्या भव्य मैदानात घेण्यात आला.यावेळी मंचावर सौ.मीनाताई बोर्डीकर त्यांच्या मुली सह उपस्थित होत्या. श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर शाळा,कॉलेज तसेच बोर्डीकर पोतदार इंग्लिश स्कुलच्या शिक्षक व कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

 


या दांडिया कार्यक्रमात आमदार मेघना बोर्डीकर सह भावना,नयना, स्वप्ना,राधिका या भगिनींनी गाण्याच्या प्रत्येक गाण्यावर ताल घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या अडीच वर्षाच्या कालखंडा नंतर प्रथमच दिपस्तंभच्या माध्यमातून व आमदार मेघना बोर्डीकरांच्या प्रयत्नाने शहरातील महिलांना तरुणींना प्रथमच दांडिया कार्यक्रमरुपी मेजवानी भेटली.






Post a Comment

0 Comments