Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | parbhani | एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शाळेत करण्यात आलेल्या गैरकायदेशिर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या रद्द करा - शिव अल्पसंख्यांक सेना





परभणी
➡️ परभणी एज्युकेशन सोसायटी F - 88 अंतर्गत डॉ . झाकेर हुसैन माध्यमिक , परभणी , सोनपेठ कनिष्ठ महाविद्यालय , परभणी , डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , सोनपेठ , गंगाखेड , जिंतूर , पालम , पुर्णा जि . परभणी , मंठा , परतूर जि . जालना या शाळेत करण्यात आलेल्या गैरकायदेशिर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणीचे निवेदन शिव अल्पसंख्यांक सेना शहर शाखाकडून आज जिल्हाधिकारी ऑचल गोयल यांना दिले.



 

या निवेदनात परभणी एज्युकेशन सोसायटी F - 88 अंतर्गत डॉ . झाकेर हुसैन माध्यमिक , सोनपेठ , परभणी , कनिष्ठ महाविद्यालय , परभणी , डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , सोनपेठ , गंगाखेड , जिंतूर , पालम , पुर्णा जि . परभणी , मंठा , परतूर जि . जालना या शाळेत गैरकायदेशिर नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे . हे की , परभणी एज्युकेशन सोसायटी मध्ये गेल्या 3 वर्षा पासून वाद चालु आहे . संस्थे मध्ये दोन गट निर्माण झाले असून सदर गट हे वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात दिशाभुल करणारे अर्ज करुन शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या करीत आहेत.



 तसेच सदर दोन दोन गटांनी आपआपले शिड्युल- 3 दाखल करुन आपआपल्या मर्जीने कोणाच्याही बदल्या केल्या . आज दिनांक 29.09.2022 रोजी संस्थेतील एका गटाने ज्यांना असिस्टंट चॅरिटी कमिशनर परभणी यांचे आदेश इन्क्वायरी नं . 165/2021 दि . 06.04.2022 नुसार संस्थे मध्ये कोणीही अध्यक्ष किंवा सचिवाचे पद ठेवलेच नाही , कारण शिड्युल 3 ही दि.06.04.2022 रोजी रिजेक्ट झालेली आहे. सध्या संस्थेवर कायदेशिर रित्या सचिव , अध्यक्ष अस्तित्वात नाही . कार्यकारी मंडळ सुध्दा बरखास्त झालेले आहे.



परंतू दिनांक 02.08.2022 ला एक गटातील दोन व्यक्तींनी अध्यक्ष आणि सचिव म्हणून मान्यता मिळण्यासाठी मा . असिस्टंट चॅरिटी कमीशनर , परभणी यांच्याकडे शिड्युल -3 सादर केले . परंतू संस्थेतील दुसन्या गटाने दिनांक 28.06.2022 रोजी दोन व्यक्तीने अध्यक्ष आणि सचिव म्हणून मान्यता मिळणेसाठी मा . असिस्टंट चॅरीटी कमिशनर , परभणी यांचे शिड्युल -3 मान्यतेसाठी दाखल केले आहे. दोन्ही गटाचे शेड्युल 3 अद्याप मा . चॅरिटी कमिशनर , परभणी यांचेकडे चौकशीसाठी प्रलंबीत आहे.



शेड्युल -3 बाबत परस्पर गटाकडून तक्रारी असल्याने अद्याप चॅरिटी कमिशनर यांनी कोणताच निर्णय दिलेला नाही . हे की , वर्ष 2010 चे चॅरिटी कमिशनरचे पत्र दिनांक 23.07.2020 नुसार शेड्युल 1 मधील 9 कार्यकारी सदस्यांना मान्यता होती परंतू मध्यतरी त्यापैकी ( 7 ) सदस्याचा मृत्यु झाल्याने आज रोजी शेड्युल -1 मध्ये केवळ ( 2 ) सदस्य हयात आहेत जे कायदेशिर मान्यता प्राप्त शेड्युल 1 वर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.




ह्यांच्या व्यतिरिक्त परभणी एज्युकेशन सोसायटी वर मा . असिस्टंट चॅरिटी कमिशनर परभणी यांची मान्यता प्राप्त असलेला एकही सभासद संस्थेवर आज रोजी कार्यरत नाही . म्हणून संस्थेवर आज रोजी केवळ ( 2 ) सदस्य आहेत . सदर सदस्य पैकी एक सदस्य मानसिक रित्या आजारी असल्याने संस्थेच्या कोणत्याही बैठकीला हजर राहु शकत नाही , संस्थेच्या कागदपत्रावर कोणी तरी खोट्या सह्या करुन कारभार चालविला जात आहे असे ऐकण्यात येत आहे.




म्हणून आज दिनांक 29.09.2022 रोजी अनाधिकृत शेड्युल -3 मधील गटाने ज्यांना मा . चॅरिटी कमीशनरची मान्यता नसतांना त्यांनी शेड्युल 1 चे सदस्यांशी जे मानसिक आजारी त्यांच्याशी संगणमत करुन 1 ) डॉ . झाकेर हुसैन माध्यमिक शाळा , परभणी येथे 2 शिक्षण सेवकाची नेमणूक केली , 2 ) डॉ . झाकेर हुसैन ज्यु . कॉलेज , परभणी येथे 2 शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या केल्या , 3 ) डॉ . झाकेर हुसैन माध्यमिक शाळा सोनपेठ येथे शिक्षण सेवकाची नेमणूक केली , 4 ) डॉ . झाकेर हुसैन माध्यमिक शाळा परतूर येथे शिक्षण सेवकाची नेमणूक केली.




 तसेच 1 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , गंगाखेड येथे 4 शिक्षण सेवक 2 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , सोनपेठ येथे 2 शिक्षण सेवक 3 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , पालम येथे शिक्षण सेवक शिक्षण सेवक शिक्षण  4 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , सेलू येथे 7 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , परतूर जि . जालना येथे 4 शिक्षण सेवक 8 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , मंठा जि . जालना येथे शिक्षण सेवक 9 ) डॉ . झाकेर हुसैन डी . एड् . कॉलेज परभणी येथे 2 नियुक्त्या केल्या . अशा प्रकारे जवळपास शिक्षण सेवकाच्या नेमणुका केल्या. संस्थेवर अध्यक्ष , सचिव आणि कार्यकारी मंडळच अस्तित्वात नसतांना ह्या शिक्षण सेवकाच्या नेमणुका झाल्या ज्या गैरकायदेशिर आहेत . 





शिक्षण सेवकाच्या निवडीसाठी कायदेशिर रित्या जाहिरात देण्यात आलेली नाही , उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत , शिक्षण सेवक भरतीसाठी शासनाकडून दिलेलया नियमावलीची अमलबजावणी करण्यात आलेली नाही , झालेल्या नेमणुकासाठी लाखोची घेवाण देवाण करण्यात आली . शेड्युल -3 ज्या गटाला चॅरिटी कमिशनर परभणी यांची मान्यताच नाही त्या गटातील सदस्यांनी ह्या नेमणुका केल्या ज्या नियमबाह्य आहे . नेमलेले शिक्षण सेवक हे गैरकायदेशिररित्या स्वयंघोषीत शेड्युल -3 मधील सदस्यांनी त्यांचे नातेवाईकांना नेमणुका दिल्या आहेत अशी चर्चा होत आहे. 



1) परभणी एज्युकेशन सोसायटी एफ -88 अंतर्गत दिनांक 29.09.2022 रोजी झालेल्या ( ) सर्व परभणी जिल्हा व जालना जिल्हा येथील डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक व 5 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , जिंतूर येथे 6 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , पुर्णा येथे  7 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , परतूर जि . जालना येथे 4 शिक्षण सेवक 8 ) डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक शाळा , मंठा जि . जालना येथे शिक्षण सेव 9 ) डॉ . झाकेर हुसैन डी . एड् . कॉलेज परभणी येथे 2 नियुक्त्या केल्या . अशा प्रकारे जवळपास एकूण (20 ) शिक्षण सेवकाच्या नेमणुका केल्या . संस्थेवर अध्यक्ष , सचिव आणि कार्यकारी मंडळच अस्तित्वात नसतांना ह्या शिक्षण सेवकाच्या नेमणुका झाल्या ज्या गैरकायदेशिर आहेत. 



शिक्षण सेवकाच्या निवडीसाठी कायदेशिर रित्या जाहिरात देण्यात आलेली नाही , उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत , शिक्षण सेवक भरतीसाठी शासनाकडून दिलेलया नियमावलीची अमलबजावणी करण्यात आलेली नाही , झालेल्या नेमणुकासाठी लाखोची घेवाण देवाण करण्यात आली . शेड्युल -3 ज्या गटाला चॅरिटी कमिशनर परभणी यांची मान्यताच नाही त्या गटातील सदस्यांनी ह्या नेमणुका केल्या ज्या नियमबाह्य आहे . नेमलेले शिक्षण सेवक हे गैरकायदेशिररित्या स्वयंघोषीत शेड्युल -3 मधील सदस्यांनी त्यांचे नातेवाईकांना नेमणुका दिल्या आहेत अशी चर्चा होत आहे . 



1 )  परभणी एज्युकेशन सोसायटी एफ -88 अंतर्गत दिनांक 29.09.2022 रोजी झालेल्या  सर्व परभणी जिल्हा व जालना जिल्हा येथील डॉ . झाकेर हुसैन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवकांच्या भरत्या रद्द करण्यात याव्यात व तसे आदेश त्वरीत पारीत करावे . 2 ) हे की , गैरकायदेशिर , नियमबाह्य झालेल्या शिक्षण सेवकाच्या नेमणुका शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जि.प. परभणी व जालना यांनी मान्यता देऊ नये . 3 ) हे की , ज्या अनाधिकृत सदस्यांनी नियमबाह्य नेमणुका केल्या त्यांचे विरुद फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंदवावा , नेमणुका करण्याचा अधिकार नसतांना नेमणुका करुन संबंधीताची फसवणुक केली.



या बाबत पोलीस विभागा मार्फत चौकशी करावी व संबंधीता विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. तसेच कार्यवाही न केल्यास नाईलाजास्तव आपल्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करावे लागेल. या निवेदनावर शिव अल्पसंख्यांक सेना शहर प्रमुख मो . अब्दुल्ला राज, सैयद नोमान सय्यद,  हुसैनी कौसर, सलीम इनामदार,  सय्यद वाजेद, बेलदार सय्यद, अनवर मां.जी, मुख्याध्यापक.कयूम आदी च स्वाक्षरी आहे.






Post a Comment

0 Comments