Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | parbhani | आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते जोडपरळीत 57 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन





परभणी
➡️ परभणी विधानसभा मतदारसंघातील टाकळी बोबडे सर्कलमधील जोडपरळी येथे आ. डॉ.राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी 57 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन आ. पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. 




यामध्ये शाळा खोली बांधकाम 18 लाख रूपये , भवानी माता मंदिर सभागृह बांधकाम 15  लाख रूपये , स्मशान भूमी कडे जाणारी नाली बांधकाम 10 लाख रूपये ,बौद्ध समाजासाठी सिमेंट रस्ता बांधकाम 14 लाख रूपये निधी मजूर करण्यात आले. 



परभणी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. येत्या काही वर्षात ग्रामीण भागातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.




यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश बोबडे, सावंगीचे सरपंच सुनील पंढरकर,जोडपरळीचे सरपंच तुषार काळे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानोबा पांचाळ, मधुकरराव काळे, अंकुशराव काळे, भगवानराव काळे, सुरेश काळे, व्यंकटी काळे, प्रकाश तात्या काळे, प्रसाद काळे, रंगराव तुकाराम काळे, साहेब बाबुराव काळे, अनंतराव काळे, इंद्रजीत काळे, संजय काळे, सुनील काळे, पंजाब काळे, सुभाष काळे, विश्वनाथ राऊत, मिलिंद राऊत, राजू राऊत, राजेभाऊ राऊत,माधव राऊत, विठ्ठल राऊत, संदीप राऊत, दीपक राऊत, लक्ष्मण राऊत आदी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments