Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | education | jintur | जिंतूरच्या जवाहर विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात





जिंतूर तालुक्यातील जिंतूर हे सर्वात मोठे परीक्षा केंद्र

एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेला एकूण एक हजार 488 विद्यार्थी सहभागी 

जिंतूर ➡️ कला संचालनालय मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजे एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेला जिंतूर तालुक्यातून एलिमेंटरीसाठी 994 विद्यार्थी तर इंटरमिजीएटसाठी 494 विद्यार्थी असे एकूण एक हजार 488 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यापैकी एकट्या जवाहर विद्यालयाचे एलिमेंटरी परीक्षेला 469 विद्यार्थी तर इंटरमिजीएट परीक्षेला 261 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.



या परीक्षेला दि.28 सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून 28 व 29 सप्टेंबर या दोन दिवशी एलिमेंटरी परीक्षा झाले तर 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर या दोन दिवशी इंटरमिजीएट परीक्षा होणार आहे. या परीक्षेला तालुक्यातून सर्वच शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सुंदर नियोजनातून ही परीक्षा संपन्न होत आहे. 

 


परीक्षेचं कामकाज व्यवस्थित पार पडण्यासाठी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी खंडेरावजी वटाणे आणि प्राचार्य बळीराम वटाणे सरांच्या सूचनेनुसार सर्व शिक्षक वर्ग परिक्षणाचे कार्य करत आहेत. या परीक्षेसाठी कला विभागप्रमुख प्रदीप कणकदंडे, सुभाष अवसरमोल यांनी परिश्रम आपले परिश्रम घेत आहेत.





Post a Comment

0 Comments