Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | gov | parbhani | मनपा प्रशासनाकडून 3 हजार 731 फेरीवाल्यांना ओळखपत्र वितरित





परभणी ➡️  महानगरपालिकेद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान तसेच शहरी बेघर निवारा या घटकांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवाड्यानिमित्त गुरुवारी आयुक्त सौ. सांडभोर, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील तसेच प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त मनोज गग्गड यांच्याहस्ते 08 बेघर व्यक्तींना रेशनकार्ड वितरीत करण्यात आले. तसेच 3 हजार 731 फेरीवाल्यांना ओळखपत्र वितरीत करण्यात आले. 01 ऑक्टोंबर पासून फेरीवाल्यांनी हे ओळखपत्र सोबत बाळगावे, ज्या फेरीवाल्यांपाशी ओळखपत्र न आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त सांडभोर यांनी दिला.



परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान परभणी शहर महानगरपालिका परभणी शहरी बेघर निवारा या घटकांतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यासेवा पंधरवाडा अंतर्गत आज प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर व अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व तसेच शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त मनोज गग्गड यांच्या हस्ते बेघर व्यक्ती यांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. 



तसेच शहरातील फेरीवाले यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी शहरामध्ये 3731 फेरीवाले यांची नोंद झाली आहे.  यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले तसेच बेघर 8 व्यक्ती यांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.  शहरातील फेरीवाले यांना सौरक्ष्ण मिळणार आहे. जास्तीतजास्त फेरीवाल्यांनी लाभ घ्यावा. शहरातील फेरीवाले 3731 यांनी ओळखपत्र सोबत ठेवण्यात यावे. 



ज्या फेरीवाल्याकडे दि.1/10/2022 पासून ज्या फेरीवाल्याकडे ओळखपत्र नसल्यावर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या फेरीवाल्याची नोंद आहे त्यांनी ओळखपत्र यांनी एन.यु.एल.एम विभाग मनपाची जुनी ईमारत या ठिकाणाहून घेवून जावे, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.  



या कार्यक्रमांतर्गत उपस्थित जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, शेख महंमद, एस एस मस्के, व शहर अभियान व्यवस्थापक  पठाण यखत्यारखान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शहरी बेघर व्यवस्थापन संस्था जनहित शहर स्तर संघ यांनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments