Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | accident | selu | देवगावफाटा येथे पाझर तलावात बुडून युवकाचा मृत्यू




 
सेलु ➡️ तालुक्यातील देवगावफाटा येथील पाझर तलावावर आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवराज गंगाधर नाईकवाड ( वय 19, रा. चिखली ता. वसमत) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी घडली.  दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबर रोजी मयत युवराजचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.



पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत युवक युवराज नाईकवाड यांचे मामा हे देवगावफाटा परिसरात खाजगी कंत्राटदार यांच्याकडे कामाला होते. 27 सप्टेंबर रोजी  देवगावफाटा परिसरात असलेल्या पाझर तलावात स्वतःचे कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी गेला होता, तो परत आला नसल्याने नातेवाईकांनी दोन दिवस त्याचा इतर ठिकाणी व तलावातील पाण्यात शोध घेतला.



या घटनेची माहिती चारठाणा पोलिसांना देण्यात आली. अखेर बुधवारी (दि.28) चारठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक बालाजी गायकवाड,  पोलीस जमादार आर.एम.कोंडरे यांनी तलाव ठिकाणी भेट देऊन नातेवाईकासह त्यांनी पाण्यात शोधकार्य चालू केले असता  दुपारी 04 वाजेच्या सुमारास युवराजचा मृतदेह  तलावातील पाण्यात मिळून आला. 



दरम्यान चारठाणा पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करुन  मयत युवराज नाईकवाड याचा मृतदेह विच्छेदनासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






Post a Comment

0 Comments