Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी महापालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धन विषयावर गणेशोत्सवात स्पर्धा






परभणी ➡️ शहर महानगरपालिकेमार्फत श्री गणेश उत्सव २०२२ निमित्त पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने गणेशोत्सव या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे





यामध्ये शहरातील श्री गणेश मंडळांना सहभागी होता येणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने संदेश/जनजागृती करणारे देखावे श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी उभारायची आहेत. उभारण्यात आलेल्या देखाव्यांची परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीने पाहणी करून पहिल्या विजेत्या गणेशमंडळांना प्रथम पारितोषीक रु. २१,००० / - , व्दितीय पारितोषीक रु.१५,०००/-, तृतीय पारितोषीक रु. ११,००० /- देऊन गौरविण्यात येणार आहे . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील नियम व अटींची पुर्तता होणे आवश्यक आहे.





स्पर्धेचे जियम व अटी : 

१. या स्पर्धेत धर्मदाय आयुक्त कार्यालय , स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येणार आहे. 

२. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 

३. सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 

४. परभणी महानगरपालिकेने दिलेले ना - हरकत / परवानगी पत्राकातील अटिंची पुर्तता झालेली असावी. 

५. निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभाचा दिनांक व ठिकाण याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

 ६. स्पर्धेचा कालावधी दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ ते दिनांक ० ९ सप्टेंबर २०२२ राहील. ७. गुणांकनासाठी वरील अ.क्र. ४ मधिल सर्व अटिंची नोंद घेण्यात येणार आहे. माझी वसुंधरा पर्यावरणपुरक गणेशउत्सवाची लोकचळवळ उभी करण ही बदलत्या काळाची गरज आहे.




स्वच्छ भारत अभियान अभियान २.०

१५ जुलै २०२२ च्या शासन निर्णय नुसार देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. माझी वसुंधरा अभियान ३.० शासन निर्णय क्र: अभियान- २०२०/प्र. क्र. १३४/ ता.क.-१ या निर्णय मध्ये नमूद आगामी काळात येणारे सण व उत्सव पर्यावरण पूरक साजरा करणे बाबत सुचविलेले आहे. तरी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे व शहरातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार यांनी सर्वाना दिल्या.






Post a Comment

0 Comments