Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कौसडी येथील सेवानिवृत्त व आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना निरोप




जिंतूर ➡️  तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मागील 10 वर्षापासून कार्यरत असलेले शिक्षक पंडित मोतीराम पाटील हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मागील चार वर्षापासून कार्यरत असलेले शिक्षक सिंधी मेश्राम युवराज वामन यांची आंतरजिल्हा बदली झाल्याबद्दल जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद कन्या शाळा या तिन्ही शाळेच्या वतीने दिनांक 30 ऑगस्ट मंगळवार रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला असून कार्यक्रमांमध्ये दोन्ही शिक्षकांना निरोप देण्यात आले.




शिक्षक पंडित मोतीराम पाटील हे एक शांत स्वभावाचे शिक्षक म्हणून ओळखले जात होते त्यांनी या दहा वर्षात अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन विद्यार्थी घडवले शाळेमध्ये त्यांची एक स्वच्छ छबी होती तर सिंधी मेश्राम युवराज वामन हे वेळेचे बंधन पाळणारे शिक्षक म्हणून ओळखले जात होते.





विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी शिक्षण मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास होता या चार वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांचे मने जिंकली होती. हे दोन्ही शिक्षक शाळा सोडून जात असताना विद्यार्थ्यांचे डोळे भरून आल्यांचे पहावयास मिळाले.या निरोप समारंभ कार्यक्रमात मुख्याध्यापिका सुनीता गाजरे मुख्याध्यापक अलीमोद्दीन शेख मुख्याध्यापक राम दहिफळे




महेश देशमुख,दिपक कुलकर्णी, योगेश लांडगे, गणेश काळे ,मनोज भालेराव,कृष्णा मुंढे,विनया लिंबेकर,सुरेखा खरटमोल,वंदना रेवतकर, मीरा कुंभारे,उषा शेळके, मुंजाभाऊ खिस्ते, विजय आव्हाड, दीपक हरकळ, प्रज्ञा खिल्लारे, वैशाली सरनाईक, स्वाती गुंजकर, सारिका टापरे, रूपाली सिरसाळकर यांच्यासह शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments